जळगाव मिरर | १८ सप्टेंबर २०२३
वरळी सी-लिंकवर दुचाकींना परवानगी नसताना देखील हेल्मेटशिवाय बुलेट चालवून मजा घेत असलेल्या 26 वर्षीय तरुणीला पोलिसांनी शुक्रवारी रात्री अटक केली. पोलिसांनी तिच्याकडे परवाना आणि वाहनाची कागदपत्रे मागताच या तरुणीने पिस्तुलाच्या आकाराचा सिगारेट लायटर पोलीस कर्मचार्यांकडे दाखवत धमकी दिली.
मिळालेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेशातील जबलपूर येथे राहणारी नुपूर पटेल ही पुण्यात आपल्या भावाला भेटण्यासाठी जात होती. मात्र, वरळी सी-लिंक पाहण्याची इच्छा असलेल्या नुपूरने मुंबईला जाण्यासाठी तिच्या भावाची दुचाकी घेतली.प्रवास सुरू करण्यापूर्वी तिला सी लिंकवर दुचाकींना परवानगी नसल्याचं माहीत नव्हतं. मात्र, सी लिंकच्या प्रवेशद्वारावरील फलकाकडेही तिने दुर्लक्ष केलं. पोलीस अधिकार्यांच्या म्हणण्यानुसार, दोन पोलीस कर्मचाऱ्यांनी तिला थांबवण्याचा प्रयत्न केला मात्र ती थांबली नाही.
त्यानंतर पोलिसांनी वाहतूक नियंत्रण आणि मुख्य नियंत्रण कक्षाला या घटनेबद्दल सतर्क केलं. तरुणीला बाहेर पडताना दिसलं की पोलीस तिची वाट पाहात आहेत.रायगडमध्ये मत्स्यव्यवसाय विभागाची मोठी कारवाई; तब्बल 5 टन मागूर मासे केले नष्टपोलिस अधिकाऱ्यांनी तरुणीला तिचा लायसन्स आणि वाहनाची कागदपत्रे मागितली असता तिने सहकार्य करण्यास नकार दिला.
पोलिसांनी तिला आपल्यासोबत पोलीस ठाण्यात येण्यास सांगितलं, तेव्हा तिने पिस्तुलाच्या आकाराची वस्तू काढून पोलिसांना म्हटलं, की ती गोळी घालू शकते. मात्र, ही वस्तू सिगारेट लायटर असल्याचं निष्पन्न झालं. पोलिसांनी लायटर आणि दुचाकी जप्त करून तिला चौकशीसाठी पोलीस ठाण्यात नेलं, त्यानंतर तिच्या भावाला माहिती दिली.पोलिसांनी तरुणीविरुद्ध कलम 353 186 , 279 (रॅश ड्रायव्हिंग), 336 (336) अंतर्गत एफआयआर दाखल केला.
