जळगाव मिरर | ६ ऑगस्ट २०२५
जळगाव जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यातील जवखेडे सिम गावाजवळ गालापुर रोडलगत काटेरी झुडपांच्या आडोशाला सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर कासोदा पोलिसांनी छापा टाकून मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत १५ जुगारींना रंगेहात पकडण्यात आले असून, त्यांच्याकडून १.२१ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे कि, दि.५ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास करण्यात आली. सहायक पोलीस निरीक्षक श्री. निलेश दिवानसिंग राजपूत यांना गुप्त माहिती मिळाल्यानंतर त्यांनी पोलीस पथकासह त्वरित कारवाई केली. पोलीस पथकाने गावाच्या बाहेरील रस्त्यावर आपली वाहने थांबवून झुडपांच्या आडोशाला पायी जाऊन छापा टाकला. त्यावेळी काही इसम जमिनीवर बसून पत्त्यांवर पैसे लावून जुगार खेळत होते.
या कारवाईत खालील १५ इसमांना ताब्यात घेण्यात आले: – सोनू धाकू भिल, विरभान श्रावण भिल, राहुल संतोष सोनवणे, प्रवीण वसंत सोनवणे, संतोष माधव सोनवणे, सुनील दग्या ठाकरे, मंगीलाल भाईदास चव्हाण, रतन धाकू भिल, अशोक गोविंदा पाटील, सचिन बापू पवार, कांतीलाल महादू सोनवणे, उत्तम बालाआप्पा जेठे, समाधान बापू पाटील, संभाजी महारू पाटील, सुनील सिताराम वाघ सर्वजण रा. जवखेडे सिम, ता. एरंडोल, जि. जळगाव. यांच्याकडून पत्यांच्या खेळातून ६,३९० रुपये रोख, तसेच अंदाजे १,१५,००० रुपये किमतीच्या दोन मोटारसायकली असा एकूण १,२१,३९० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी पोलीस नाईक दीपक देसले यांच्या फिर्यादीवरून संबंधित १५ जणांविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम १२(अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक मा. महेश्वर रेड्डी यांच्या आदेशानुसार, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती नेरकर, व उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. विजय ठाकूरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईत सपोनि निलेश राजपूत यांच्यासह पो.हे.क. नंदलाल परदेशी, पो.ना. प्रदीप पाटील, पो.कॉ. समाधान तोंडे, निलेश गायकवाड, योगेश पाटील, कुणाल देवरे, दीपक देसले, व लहु हटकर यांचा सक्रिय सहभाग होता. पोलीसांच्या या धडाकेबाज कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली असून, पुढील तपास सुरू आहे.
