जळगाव मिरर | १३ डिसेंबर २०२३
जळगाव जिल्ह्यातील अनेक ग्रामीण भागात सुरु असलेल्या गुटखा बंद करण्यासाठी प्रशासन व पोलीस विभाग नेहमीच कारवाई करीत असतांना देखील सुरुच आहे. नुकतेच वरणगांव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हतनूर येथील एका दुकानावर पोलीसांनी छापा टाकून १५ हजार रुपयांचा विमल गुटखा जप्त करीत दोघांवर कारवाई केली. तर पोलीस ठाण्याचे नवनिर्वाचित सपोनि भरत चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली हि पहिलीच कारवाई असून अशा कारवायांमध्ये सातत्य राहील का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नव्याने रुजू झालेले वरणगाव पोलिस ठाण्याचे सपोनि भरत चौधरी यांना हतनूर गावात एका किरणा दुकानात विमल गुटखा विक्री साठी आलेल्याची माहिती मिळाली असता. श्री चौधरी यांनी पथक तयार करण्यात आले.
या पथकात पोहे कॉ योगेश पाटील, अतुल बोदडे, विजु बावस्कर, वाहतूक पोलिस रामचंद्र मोरे यानी हतनूर गावातील लकी किरणा दुकाना जवळ साफळा रचून संशयीत आरोपी नरेंद्र महाजन पुर्ण नाव माहीत नाही. राहणार दसनूर ता. रावेर हा लकी किराणा दुकानदार विलास उत्तम चौधरी (वय ३२) रा. हतनूर ता. भुसावळ याचे दुकानात विमल गुटखा विक्रीसाठी घेवून आला असता दुकानात विमल गुटखा मिळून आला. मुद्देमालासह दोघांना पोलिसांनी पंधरा हजार ४०० रुपये किमतीचा माल जप्त करण्यात आला आहे