जळगाव मिरर | ५ जुलै २०२४
पोलीस भरतीसाठी १३७ शिपाई पदांच्या जागांसाठी मैदानी चाचणी घेण्यात आली. यामध्ये उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची दि. ७ जुलै रोजी लेखी परिक्षा होणार आहे. लेखी परिक्षेसाठी १ हजार ३१५ उमेदवार पात्र ठरले आहे. सकाळी ९ ते १०. ३० वाजेदरम्यान, शहरातील एम. जे. कॉलेजमध्ये होणार आहे.
राज्यात पोलीस दतार्फे विविध संवर्गासाठी पोलीस शिपाई पदासाठी भरती प्रक्रिया सुरु आहे. जिल्हा पोलीस दलातर्फे १३७ जागांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात आली. यामध्ये ६ हजार ४६८ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते, तर त्यापैकी ३ हजार ८२४ उमेदवारांची मैदानी चाचणी झाली होती. या उमेदवारांपैकी १ हजार ३१५ उमेदवार लेखी परिक्षेसाठी पात्र ठरले आहे. या उमेदवारांची यादी जिल्हा पोलीस दलाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली असून त्यांना लेखी परिक्षेबाबत देखील कळविण्यात आले आहे.
लेखी परिक्षेला पात्र असलेल्या उमेदवारांनी दि. ७ जुलै रोजी सकाळी ८ वाजता परिक्षास्थळी उपस्थित रहावे. १०० गुणांसाठी होणाऱ्या लेखी परिक्षेचे साहित्य परिक्षा केंद्रावर उपलब्ध करा दिले जाणार आहे. त्यामुळे उमेदवारांनी मोबाईल किंवा इतर कोणतेही इलेक्ट्रॉनिक्स वस्तू व साहित्य सोबत आणून नये. लेखी परिक्षेच्या पत्रासह ओळखपत्र आवश्यक परिक्षेसाठी येतांना उमेदवारांनी महाआयटीकडी लेखी परिक्षा पत्रसह, स्वतःचे आधारकार्ड व पोलीस घटकाचे ओळखपत्र सोबत आणावे. असे आवाहन पोलीस अधीक्षक यांनी प्रसिद्ध पत्रकाद्वारे कळविले आहे.