जळगाव मिरर | २ नोव्हेंबर २०२३
मुंबई येथे सोमवारी महाराष्ट्र शासन, कामगार विभाग, महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचा विश्वकर्मा गुणवंत कामगार पुरस्कार २०२१-२२ चाळीसगाव येथील रहिवासी व भुसावळ औष्णिक विद्युत केंद्र दिपनगर येथील कर्मचारी प्रफुल्ल (तन्मय) सोमनाथ आवारे यांना महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांचे हस्ते प्रदान करण्यात आला.
यावेळी कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे, पालक मंत्री तथा शालेय शिक्षण मंत्री दीपक केशरकर, आमदार कालिदास कोळंबकर, कामगार विभागाच्या प्रधान सचिव विनिता वेद सिंघल ,मुंबई जिल्हाधिकारी क्षीरसागर, कामगार आयुक्त सतिश देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते .पुरस्काराचे स्वरूप २५ हजार रुपये धनादेश , स्मृती चिन्ह, सन्मान पत्र, पदक देऊन सन्मानित करण्यात आले. भुसावळ औष्णिक विद्युत केंद्र दिपनगर चे मुख्य अभियंता श्री मोहन आव्हाड व उप मुख्य औद्योगिक संबंध अधिकारी मुकेश मेश्राम यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.