
जळगाव मिरर । ३१ डिसेंबर २०२२
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळ्गावतंर्गत आंतर महाविद्यालय हॉकी पुरुष स्पर्धेत प्रताप महाविद्यालयाच्या संघाने त्रिमूर्ती फार्मसी महाविद्यालय,जळगाव संघाचा पराभव केला.या अंतिम सामन्यात प्रताप कॉलेजच्या संघाने 3-1 अशा फरकाने गोल करुन प्रतिस्पर्धी संघाचा पराभव केला.
या स्पर्धा बांभोरी अभियांत्रिकी महाविद्यालय,जळ्गाव येथे 31 डिसेंबर 22022 रोजी संपन्न झाल्या.मा. रजिस्टार, रेक्टर,(बांभोरी कॉलेज )प्रा.डॉ.शैलेश पाटील, क्रीडा संचालक प्रा.सचिन पाटील, प्रा.जे.बी शिसोदिया उपस्थित होते.या यशा बद्दल खा.शि.मंडळाचे चिटणीस डॉ.ए.बी.जैन,प्रभारी प्राचार्य डॉ.पी.आर.शिरोडे,डॉ.एम.एस.वाघ, डॉ.जयेश गुजराथी, डॉ.जे.बी.पटवर्धन,वरिष्ट जिमखाना विभागाचे प्रमुख डॉ.विजय तुंटे,डॉ.हर्षवर्धन जाधव,डॉ.रवि बाळसकर,डॉ.माधव भुसनर,प्रा.आर.सी.सरवदे,डॉ.तुषार रजाळे,डॉ.अमोल माणके,ग्रंथपाल दिपक पाटील,डॉ.नलिनी पाटील,प्रा.विजय साळुंखे,प्रा.विवेक बडगुजर,प्रा.रामदास सुरळकर,प्रा.ज्ञानेश्वर कांबळे आदिनी अभिनंदन केले आहे.




















