जळगाव मिरर । २४ सप्टेंबर २०२३
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यातील अनेक ठिकाणी विविध सामाजिक कार्यक्रम घेऊन साजरा करण्यात येत आहे. जळगाव शहरात देखील मनपाचे माजी उपमहापौर डॉ. अश्विन शांताराम सोनवणे यांच्यातर्फे आज दि. २४ रोजी आयुष्यमान भारत महात्मा ज्योतिबा फुले आरोग्य योजना आभा कार्डचे ग्रामविकास मंत्री ना.गिरीश महाजन यांच्याहस्ते वितरित करण्यात आले.
जळगाव शहरातील गणेश कॉलनी परिसरात आज दि. २४ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसा निमित्त सेवा पंधरवाडा भाजपातर्फे साजरा केला जात असुन त्याअंतर्गत भाजपाचे माजी उपमहापौर डॉ.अश्विन शांताराम सोनवणे यांच्या माध्यमातून आयुष्यमान भारत महात्मा ज्योतिबा फुले आरोग्य योजना आभा कार्ड चे ग्रामविकास मंत्री ना.गिरीश महाजन यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. या शिबिराचा सायंकाळ पर्यंत १० हजार लोकांनी लाभ घेतला. यावेळी आ.राजुमामा भोळे, महानगर अध्यक्ष उज्वलाताई बेंडाळे, डॉ.राधेश्याम चौधरी, माजी महापौर सीमा भोळे, नगरसेवक धीरज सोनवणे, रेखा वर्मा, नगरसेवक जितेंद्र मराठे, मनोज काळे, दीपमाला काळे, शुचिता हाडा, राजेंद्र मराठे, अरविंद देशमुख, महेश चौधरी, प्रकाश बालानी, क्षितिज भालेराव, भुषण भोळे, राहुल पाटील, राहुल मिस्तरी, सागर जाधव, अशोक घाडगे, मुविकोराज कोल्हे , अनिल माळी, आकाश पारधे, भाग्यश्री चौधरी, नंदिनी दर्जी, चित्रा मालपाणी, संगीता पाटील, विशाल त्रिपाठी, मनोज भंडारकर यांच्यासह भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपास्थीत होते.