
जळगाव मिरर / २ नोव्हेंबर २०२२
शिवाजीनगर वज्रेश्वरी मंदिर येथून माजी शिवसेना विभाग प्रमुख विजय राठोड यांच्या नेतृत्वात व स्थानिक त्रस्त नागरिकांकडून जिल्हाधिकारी कार्यालय व सार्वजनिक बांधकाम विभाग जळगाव येथे मोर्चा काढण्यात आला. छ.शिवाजीनगर मधील गेल्या ४ वर्षापासून प्रलंबित असलेला T आकाराच्या पुलाचा मुख्य मुद्दा तसेच रहिवासी भागाकडील बोगदा,समांतर रस्ते, पुलाखालील जिन्याचा प्रश्न व इतर समस्यांसंदर्भात जिल्हाधिकारी साहेबांना व पीडब्ल्यूडी च्या अधिकाऱ्यांना निवेदन सादर केले असता वरील मागण्या मान्य न झाल्यास आंदोलनाचा इशाराही देण्यात आला.
सदर प्रसंगी शिवसेनेचे विजय राठोड,जहांगीर खान, सचिन राणा ,राकेश बाविस्कर, भूषण कोष्टी ,अकील पैलवान, अरुण शिंदे ,सय्यद जमील सय्यद हबीब,समीर खाटीक ,रेखा अलोने,प्रतिभा गवळी,अनिता देवरे,पार्वती गवळी,लिलाबाई गवळी,सुनीता गवळी,उमर शेख,सुमित पंडित,रफिक शेख यांच्या सह समस्त शिवाजीनगर मधील त्रस्त नागरिक उपस्थित होते.




















