अमळनेर : विक्की जाधव
छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान करणाऱ्या राज्यपाल भगतसिंग कोश्यारी व भाजप प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांचा उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेतर्फे अमळनेरात आज प्रतिमेला जोडेमार आंदोलन करून निषेध व्यक्त करण्यात आला.
महाराणा प्रताप चौकात सकाळी ११ वाजता शिवसेनेचे तालुका प्रमुख विजय पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. यावेळी अखंड हिंदुस्थानचे दैवत छत्रपती शिवराय यांनी औरंगजेब यांची माफी मागितली होती असा शोध भाजपचे सुधांशु त्रिवेदी यांनी लावला त्याच प्रकारे महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोषारी यांनी देखील छत्रपती शिवराय यांची तुलना केंद्रातील मंत्री नितीन गडकरी यांच्याशी करून छत्रपती शिवराय यांचा अवमान केला. म्हणून भगतसिंग कोश्यारी व सुधांशु त्रिवेदी यांच्या धिक्कार असो आशा घोषणा देत हे आंदोलन करण्यात आले. यावेळी विजय पाटील, बाबू परब, महिला आघाडीच्या मनीषा परब, नाना ठाकूर, अनंत निकम, देवेंद्र देशमुख, मयूर पाटील, विमल बाफना, मोहन भोई, दादा पवार, गोरख पाटील, बाळासाहेब पवार, प्रताप शिंपी, जीवन पवार आदी उपस्थित होते.
