जळगाव मिरर | २३ जानेवारी २०२५
ग्राहक तीर्थ स्व.ना.बिंदू माधव जोशी यांच्या अथक परिश्रमातून निर्माण झालेल्या ग्राहक पंचायत या संस्थेच्या महाराष्ट्र राज्याच्या संघटनेचे दिनदर्शिका छापून तयार झाली आहे ग्राहक पंचायत व हितसंबंधी ग्राहक परिवारात या दिनदर्शिकाचे वितरण करायची आहेत.
त्याकरिता या दिनदर्शिकेचे प्रकाशन ग्राहक पंचायत महाराष्ट्राची जळगांव जिल्हा व तालुका टीम या संघटनेच्या वर्ष 2025चे दिनदर्शिकेचे प्रकाशन करताना जळगांवचे जिल्हाधिकारी श्री आयुष प्रसाद, मुख्य पुरवठा अधिकारी साहेब मा.श्री संजयजी गायकवाड सर,संघटनेचे जिल्हाध्यक्ष गुरुबक्ष जाधवानी ,जिल्हा सचिव श्री डॉ.नितीनजी धांडे, अशासकीय सदस्य सौ.सुषमा चव्हाण, अशासकीय सौ. अंतिम पटणी,जळगांव तालुका सचिव सौ. मनीषा पाटील सौ साक्षी जाधवानी,आशा मौर्य, हर्षा गुजराती,माधुरी शिंपी इत्यादी उपस्थित होते. दिनदर्शिकेतील विस्तृत माहिती आणि राष्ट्राच्या सामाजिक नैतिक उन्नती करिता ज्यांनी योगदान दिले अशा नेत्यांच्या परिचय देखील याच समाविष्ट करण्यात आलेला आहे.