जळगाव मिरर । २१ जून २०२३
जळगाव-धुळे महामार्गावर असलेले गुजरात पेट्रोल पंप व दादावाडी स्टॉपजवळील उड्डाणपूलाच्या बाजूने रस्ते बनविले आहेत. पण याच रस्त्यामुळे अनेक अपघात या भागात नियमित होत असून यासाठी जळगाव मनपाने या रस्त्यावर स्पीड ब्रेकर टाकण्यात यावे अशी मागणी परिसरातील रामराज्य गृपचे अध्यक्ष नितीन जाधव यांनी मनपा आयुक्त गायकवाड यांना भेटून निवेदन देत मागणी केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, गुजरात पेट्रोल पंप व दादावाडी स्टॉप येथीले उडान पुलाखालील रस्त्यावर स्पीड ब्रेकर बसविणे अत्यंत आवश्यक झालेले असून तेथे दररोज वाहनांच्या जास्त वेगाने तसेच आठवडे बाजार व पुलाखालून रस्ता ओलांडा समोरून वेगात येणाऱ्या वाहनमुळे दोन तीन वेळेस अपघात झाला आहे वेग नियंत्रणात नसतात त्यामुळे अपघात होण्याचे वेळो वेळी परिस्थिती निर्माण होते. म्हणून वेगाने येणाऱ्या वाहनाचे वेगावर नियंत्रण असणे आवश्यक आहे त्याकरता विनंती करण्यात येते की कृपया सदरच्या दोन्ही उडान पुलाच्या स्टॉप वर त्वरित स्पीड ब्रेकर बसविण्याबाबत संबंधांना आदेश व्हावेत त्यामुळे होणाऱ्या संभाव्य अपघातांवर नियंत्रण होईल. यावेळी रामराज्य ग्रुपचे अध्यक्ष नितीन जाधव, प्रवीण पाटील, रोहन सोनवणे, विशाल पाटील, जयेश नेवे, प्रशांत पाटील. इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते
