जळगाव मिरर | १५ एप्रिल २०२४
यावल तालुक्यातील कोरपावली व येथे फैजपुर येथील उपविभागीय पोलीस 7 अधिकारी कार्यालयाच्या सहायक पोलिस अधिक्षक अन्नपुर्णा सिंग यांच्या न मार्गदर्शनाखाली पोलिसांच्या पथकाने व झन्नामन्ना जुगार खेळतांना चार जणांवर कार्यवाही केली. व येथुन दुचाकी वाहन, मोबाइल फोन व रोख रक्कम असा एकुण अडीच लाख रुपयांचे मुद्देमाल जप्त केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, यावल तालुक्यातील कोरपावली या गावात गुरूवारी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास जुगार अड्डा सुरू असल्याची गोपनिय माहिती फैजपूरच्या विभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाच्या सहायक पोलिस अधिक्षक अन्नपुर्णा सिंग यांना मिळाली होती तेव्हा त्यांच्या आदेशाने यावल चे पोलीस निरिक्षक प्रदीप ठाकुर, सहाय्यक – फौजदार विजय पाचपोळे, गणेश मनुरे, भरत कोळी, अनिल साळुंके यांच्यासह पोलीस कर्मचारी यांच्या पथकाने कार्यवाही करीत व कोरपावली शेत शिवारातील अजीज शमशेर तडवी यांच्या मक्कयाच्या शेतात कमलेश आत्माराम पाटील, अजीज शमशेर तडवी, हुसैन खान अख्तर खान व तुषार दिलीप तायडे हे चौघे स्वताच्या फायद्यासाठी गैरकायद्याने झन्नामन्ना हा हारजितचा पत्ता जुगार खेळतांना मिळून आले व तेथुन चार दुचाकी, दोन मोबाइल व २० हजार रूपये रोख असा एकुण अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे तर या प्रकरणी यावल पोलिस ठाण्यात हवालदार गणेश मनुरे यांनी दिलेल्या फिर्यादी वरून चार जणाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलिस निरिक्षक प्रदिप ठाकुर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार विजय पाचपोळ करीत आहे.
