जळगाव मिरर / २६ मार्च २०२३ ।
यंदाची मनसेच्या राज्यातील गुढीपाडव्याची सभेतून अनेक मोठ्या कारवाई झाल्यानंतर प्रथमच राज ठाकरे पुण्यात आज दाखल झाले आहेत. त्यांनी यावेळी गेल्या काही दिवसांपासून मनसेचे नेते वसंत मोरे नाराज असल्याची चर्चा होती. यादरम्यान पुण्यातील मनसे पदाधिकारी आणि वसंत मोरे यांच्यामधील अंतर्गत वाद देखील चव्हाट्यावर आला होता. मात्र आता खुद्द मनसेप्रमुख राज ठाकरे वसंत मोरे यांच्यासाठी पुण्यात आले आहेत.
राज ठाकरे यांनी आज पुणे दौऱ्यावर असताना पक्षाचे नेते वसंत मोरे यांची भेट घेतली तसेच मोरे यांनी पुण्यातील कात्रज भागात उभारलेल्या श्वान संगोपन केंद्राचे उद्घाटन राज ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुण्यात होणाऱ्या नदी सुधार प्रकल्पाचा आढावा घेणार असून या प्रकल्पाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून विरोध आहे. या प्रकल्पांतर्गत सहा हजार झाडांची कत्तल होणार असल्याच्या कारणाने अनेक पर्यावरण प्रेमींनी या प्रकल्पाचा विरोध केला आहे. दरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज पुण्यात असताना वसंत मोरे यांनी त्यांना या प्रकल्पाबाबत अधिक माहिती दिली.
राज ठाकरे यांनी या प्रकल्पाचा थोडक्यात आढावा घेतल्यानंतर या प्रकल्प संदर्भात फोटो आणि माहिती मागून घेतली आहे. यामुळे नदी सुधार प्रकल्प संदर्भात राज ठाकरे काय भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं आहे. पुणे दौऱ्य़ात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे श्वान प्रेम समोर आलं आहे. राज ठाकरे यांनी आज पुणे दौऱ्यावर असताना मनसे अध्यक्ष पक्षाचे नेते वसंत मोरे यांची भेट घेतली. तसेच वसंत मोरे यांनी पुण्यातील कात्रज भागात उभारलेल्या श्वान संगोपन केंद्राचे उद्घाटन राज ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी राज ठाकरे यांनी येथे सुरू झालेल्या केंद्राचा आढावा देखील घेतला. राज ठाकरे यांचे श्वान प्रेमी सर्वश्रुत आहे. ग्रेड डेन प्रजातीचे “जेम्स” नावाचा श्वान राज ठाकरे यांच्याकडे होता मात्र जून २०२१ मध्ये त्याचे निधन झाले आहे.