जळगाव मिरर । २० डिसेंबर २०२२
अमळनेर येथील दि १७ डिसेंबर रोजी डायल ११२ या वाहनावर पो.ना.मिलिंद भामरे व सुर्यकांत साळुंके व कपील पाटील गावात पेट्रोलींग ड्यूटी करीत असतांना पो.नि.विजय शिंदे यांनी सांगीतले की गुप्त बातमीदारा मार्फत खबर मिळाली आहे की एक संशयीत इसम अमळनेर शहरात सुभाष चौकातुन रेल्वे स्टेशन कडे जात आहे त्यास चौकशी कामी वरील पोलिसांनी ताब्यात घेवून नाव गाव व पत्ता विचारला असतां तो उडवा उडविची उत्तरे देऊ लागला तेव्हा त्यास पोलीस ठाण्यात आणुन सखोल चौकशी केली असतां सदर इसमाने त्याचे नाव परबतसिंग मदनसिंग भाटी रा दहीफडा खिच्या ता लोणी झवर जि जोधपुर राजस्थान असे सांगितले.
त्या वरुन अमळनेर पोलिसांनी राजस्थान पोलीसांशी संपर्क साधला असता सदर इसम अट्टल चारचाकी वाहन चोर आहे व त्यास राजस्थान पोलीस शोध घेत आहेत त्याच्यावर राजस्थान येथे दि ५/१२/२०२२ रोजी १९५/२०२२ भा द वि ३७९ प्रमाणे पोलीस स्टेशन झवर येथे सदर इसमावर आरजे 10 सी 0061 महिन्द्रा थार गाडी चोरी केल्याबाबत गुन्हा दाखल असुन त्याने गाडी वर ड्युब्लीकेट गोवा पासींग नंबर टाकला आहे व तो गाडी घेवून महाराष्ट्राच्या दिशेने गेला असुन स्वतः चा मोबाईल बंद करून ठेवला आहे बाबत माहिती मिळाल्याने त्यास गाडी बाबत विचारणा केली असता मध्यप्रदेश येथील महु येथे गाडी लपवली आहे असे सांगीतल्या वरुन पो नि विजय शिंदे यांनी राजस्थान येथील पोलीसांना अमळनेर येथे बोलावून सदर इसमाला गुन्ह्यातील पुढील कारवाई साठी राजस्थान पोलीसांचे ताब्यात दिले आहे.