जळगाव मिरर / २ मार्च २०२३ ।
बस कंडक्टर होण्यापासून ते आता कॉलिवूडमधील टॉप स्टारच्या दर्जाचा आनंद घेण्यापर्यंत रजनीकांत यांचा प्रवास हा खूप चर्चेतला राहिला आहे. साऊथचा सुपरस्टार रजनीकांत आपल्या थलाईव्हा स्टाइलमुळे देशभरात प्रसिद्ध आहेत. रजनीकांतने आपल्या सुपरहिट सिनेमे दिले आहेत.
आतापर्यंत रजनीकांत यांनी त्यांच्या करिअरमध्ये 169 वा चित्रपट शूट केले आहेत. त्यानंतर आता रजीकांत लायका प्रॉडक्शनसोबत आणखी एक चित्रपट करण्यासाठी सज्ज असून या चित्रपटाचे नाव सध्या Thalaivar 170 असे ठेवण्यात आले आहे. Thalaivar 170 या चित्रपटाबाबत लायका प्रॉडक्शनने आज घोषणा केली. या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी जय भीम फेम दिग्दर्शक टीजी ज्ञानवेल यांच्यावर सोपवण्यात आली. तर चित्रपटाचे संगीत अनिरुद्ध देणार आहे. लायकाने अध्यक्ष सुभास्करन यांच्या वाढदिवसानिमित्त सोशल मीडिया हँडलवर ही बातमी ट्विट करून माहिती दिली. रजनीकांत सध्या त्यांची लेक ऐश्वर्याच्या ‘लाल सलाम’ या चित्रपटामध्ये व्यस्त आहेत.
We are feeling honoured to announce our next association with “Superstar” @rajinikanth 🌟 for #Thalaivar170 🤗
Directed by critically acclaimed @tjgnan 🎬 Music by the sensational “Rockstar” @anirudhofficial 🎸
🤝 @gkmtamilkumaran
🪙 @LycaProductions #Subaskaran#தலைவர்170 🤗 pic.twitter.com/DYg3aSeAi5— Lyca Productions (@LycaProductions) March 2, 2023
बस कंडक्टर होण्यापासून ते आता कॉलिवूडमधील टॉप स्टारच्या दर्जाचा आनंद घेण्यापर्यंत रजनीकांत यांचा प्रवास हा खूप चर्चेतला राहिला आहे. मीडिया रिपोर्टनुसार रजनीकांत यांच्या करिअरमधील 170वा चित्रपट असणार आहे. शिवाय या चित्रपटाचे दिग्दर्शन जय भीमचे टीजी ज्ञानवेल करणार आहेत. ऐश्वर्या ही रजनीकांत यांची मोठी मुलगी असून, प्रसिद्ध चित्रपट निर्माती देखील आहे. यापूर्वी ती धनुषसोबत विभक्त झाल्यामुळे प्रचंड चर्चेत आल होती. ऐश्वर्याने कोरोना लॉकडाऊनच्या काळातच रजनीकांत यांना चित्रपटाची कल्पना सांगितली होती. यानंतर ऐश्वर्याने आपल्या डोक्यातील या कल्पनेचे स्क्रिप्टमध्ये रूपांतर केले आणि पटकथा वाचल्यानंतर रजनीकांत देखील लेकीच्या या कथानकाने प्रभावित झाले.





















