महाराष्ट्रातील थोर समाजसेविका सिंधुताई सकपाळ म्हणाल्या होत्या, महाराष्ट्रात जर मोठ व्हायच असेल तर तुम्हाला मराव लागेल. तसेच हिंदुहृदय सम्राट स्व.बाळासाहेब ठाकरे हे सुध्दा जनतेला सोडून गेल्यावर जनतेला त्यांची किंमत कळाली. म्हणजेच महाराष्ट्रात कोणतेही काम करुन मोठ व्हायचे असेल तर मराव लागेल. पण सध्या महाराष्ट्रात मोठे होणारी फार काही माणसं शिल्लक नाहीत. पण कार्यकर्त्यांसह नेत्यांना मोठे करणारा माणूस सध्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून कार्यकर्त्यांना लढायचे बळ देत आहे. ते म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे त्यांचा आज वाढदिवस त्याअनुंषगाने एक विशेष लेख !
स्व.बाळासाहेब ठाकरे, स्व.सिंधूताई सपकाळे हे जरी आज आपल्यात नाही पण आजही ते मनामनात विचार बनून जिवंत आहेत. त्यानी देखील कित्येक सैनिक मोठे केले आणि राजसाहेब सुध्दा तेच करत आहेत. बाळासाहेबांचे विचार जर घेउन चालत असतील तर ते आहेत. अनेक नेत्यांनी त्यांचे विचार भिंतीवर स्वार्थासाठी टांगले तो त्यांचा प्रश्न राहिला. आजचे वास्तव हे आहे की त्यांची सावली बनून त्यांच्या विचारांवर लोककल्याणासाठी झटणारा एकमेव नेता ह्या महान महाराष्ट्रात आहे. संपूर्ण महाराष्ट्रात असा एकही नेता नाही ज्या नेत्यावर लोक कल्याणासाठी ढीगभर केसेस असतील. फक्त एक नेता सोडून ते म्हणजे आपले सर्वांचे लाडके राजसाहेब ठाकरे.
जगाच्या पाठीवर लाखो लोकांमधून एखाद नेतृत्व अस जन्माला येत की ते जरी सत्तेवर नसल तरी लोक त्यांचे नेतृत्व स्वीकारतात कारण त्यांचे नेतृत्वाला जनतेची जान आहे असा वाटतं तशीच परिस्थती आपल्या नेत्याबद्दल आहे. उभ्या हिंदुस्थानातील शिवतीर्थ ला स्वतः च्या अडचणी घेउन लोक येतात एकच आशा असते की आपला राजाचं आपल काम करु शकतो आणि त्यांच काम होतच म्हणूण लोक येतात.
हिंदू धर्म विरोधी षडयंत्र बद्दल, भोंग्याबद्दल , नैसर्गिक आपत्ती बद्दल, मराठी पाट्या बद्दल , मुदत संपून देखील ज्यादा होणाऱ्या टोल वसुली बद्दल , अनेक लोकांच्या नोकऱ्या गेल्यावर, पगार न मिळाल्यावर, मराठी मानसा वरील होणाऱ्या अत्याचार बद्दल , मुलींची छेड काढणाऱ्या बद्दल, मुजोर कंपनी बद्दल, मुजोर शासकिय अधिकारि बद्दल, शासनाकडून मिळत नसलेल्या प्रतिसाद बद्दल , अश्या अनेक विषयावर प्रत्येकाला आधीं मनसे पक्षाची आठवण येते कारण महाराष्ट्र नवनिर्माण सेना जिथं जनतेचा प्रश्न असतो तिथं उभीच राहते म्हणूण म्हणतात लोक…. प्रश्न जिथं जनतेचा मार्ग तीथ मनसे चा.
राजसाहेब हे उत्तम कलाकार, व्यंगचित्रकार आणि अश्या अनेक कलांनि पारंगत आहेत म्हणून कलाकाराचा नेहमीं ते कौतुक करतात कारण कलाकार होन सोप नाही. ते राखून साहेब जनतेसाठी जनतेने खुर्चीवर बसविलेल्या नेत्यांशी लढतात हे जनतेला कळन फार महत्वाचं आहे. प्रत्येक महाराष्ट्र सैनिकचा मागें एक विलक्षण अशी प्रचंड ताकदीची शक्ति उभी आहे तीच नाव आहे वंदनीय श्री राजसाहेब ठाकरे. संपूर्ण महाराष्ट्रात जनतेने एक लक्षात घ्यावं की हेच श्री राजसाहेब ठाकरे म्हणतात की नेत्यांच्या घरात सगळी पदे आहेत आणि राहणार तसच मतदान करताना मागील सत्तर वर्षात तुम्हाला रस्ते,गटार,नाले,पाणी याबद्दलच मत मागितलं जात आणि अफाट कोट्यवधी चा निधी पास होतो मग लोकांना हे कसं कळत नाही तेच दुर्दैव आहे. एखादा माणूस नगरसेवक किंवा सरपंच बनतो आणि पंचवार्षिक मध्येच कोट्यधीश होतो मग तरी तुमचे डोळे उघडतं नाही हे सत्य स्टेजवर बोलणारा नेता महाराष्ट्राला लाभला तरी जनतेला जर कळतं नसेल तर नक्कीच दुर्दैवाची गोष्ट आहे. बोलण्यासारखं खूप आहे परंतू लोकांना सोयीचं बोलण खुप आवडत असो आज आमच्या साहेबांचा जन्मदिवस म्हणजे आम्हा महाराष्ट्र सैनिकांसाठी सोन्याचा दिवसच.
शेवटच बोलत सोन्यापेक्षाही कित्येक पटीने तेजस्वी नेतृत्व महाराष्ट्राच्या राजकारणाला लाभलेलं आहे त्याची लोकांनी किंमत करून मतदान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेलाच केल तर नक्कीच उभ्या जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र नवनिर्माण नक्कीच होणार.
आम्हा सर्व महाराष्ट्र सैनिकांकडून आणि जनतेकडून आपणास वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा असाच आशीर्वाद आमच्यावर सदैव असेच असु द्या.
– दिपक पाटील(महाराष्ट्र सैनिक)
वाढदिवस विशेष लेख !
