• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

मराठी भाषेसाठी राजू बाविस्कर यांना साहित्य अकादमीचा पुरस्कार प्रदान

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
April 1, 2026
in जळगाव, जळगाव ग्रामीण, सामाजिक
0
मराठी भाषेसाठी राजू बाविस्कर यांना साहित्य अकादमीचा पुरस्कार प्रदान
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १ एप्रिल २०२६

साहित्य अकादमीतर्फे २०२५ या वर्षासाठी जाहीर करण्यात आलेल्या साहित्य पुरस्कारांचे आज येथे वितरण  करण्यात आले. मराठी भाषेसाठी जळगाव येथील प्रसिद्ध चित्रकार व लेखक राजू बाविस्कर यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. मानचिन्ह, शाल आणि एक लाख रुपये रोख असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

देशातील मान्यताप्राप्त २४ भाषांमधील उत्कृष्ट साहित्यकृतींना यंदाचे साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाले होते.  त्यात मराठी भाषेसाठी जळगाव येथील प्रसिद्ध चित्रकार व लेखक  राजू बाविस्कर यांच्या ‘काळ्यानिळ्या रेषा’ या आत्मकथेसाठी लेखक राजू बाविस्कर यांना हा सन्मान जाहीर झाला होता. नवी दिल्लीतील कमानी ऑडिटोरियममध्ये झालेल्या या विशेष समारंभात  साहित्य अकादमीचे अध्यक्ष माधव कौशिक यांच्या हस्ते श्री. बाविस्कर यांना सन्मानित करण्यात आले. यावेळी प्रसिद्ध हिंदी साहित्यिक आणि साहित्य अकादमीचे माजी अध्यक्ष विश्वनाथप्रसाद तिवारी, अकादमीच्या उपाध्यक्षा श्रीमती कुमुद शर्मा, संस्कृती मंत्रालयाचे संचालक अनीश राजन, अकादमीच्या सचिव श्रीमती पल्लवी होळकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

साहित्यिकांना पुरस्कार देऊन सन्मानित करणे हे समाजाचे दायित्व असल्याचे सांगून श्री. विश्वनाथ प्रसाद तिवारी म्हणाले, की समाजातील या सृजनशील सकारात्मकतेचा गौरव झाला नाही तर समाज मूल्यहीन होऊन नष्ट होईल . त्यामुळे या सृजनाचा गौरव करणे ही अमूर्त स्वरूपातील समाजाचे प्रतिनिधी असलेल्या साहित्य अकादमीसारख्या संस्थांची जबाबदारी आहे. त्यासोबतच तो समाजाचा धर्म म्हणजेच कर्तव्यही आहे. साहित्यिकांच्या साहित्यातून समाजाला प्रेरक मुल्ये मिळत असतात. लेखक हा सदैव जागरूक असतो. त्याचे जीवन वैशिष्ट्यपूर्ण असते कारण तो एकाच जगण्यामरण्यात अनेक जगणे-मरणे अनुभवत असतो. असे सांगून त्यांनी पारतंत्र्याच्या कालखंडात प्रख्यात साहित्यिक भारतेंदू हरिश्चंद्र यांच्या साहित्याने एक युग निर्माण केले. त्यातून पुढे आलेल्या स्वदेशी आणि स्वभाषा या दोन्ही मूल्यांची पुढे चळवळ झाली, याचा दाखला दिला.
अकादमीचे अध्यक्ष माधव कौशिक यांनी पुरस्कारांमागची भूमिका विषद केली . सचिव श्रीमती होळकर यांनी प्रास्ताविक केले तर श्रीमती कुमुद शर्मा यांनी आभार मानले.

यंदाच्या पुरस्कारांमध्ये काव्यसंग्रह, कादंबरी, कथासंग्रह, निबंध, समीक्षा, आत्मकथा अशा विविध साहित्य प्रकारांतील विविध पुस्तकांची निवड करण्यात आली आहे. देशातील विविध भाषांमधील साहित्यिक परंपरेचे प्रतिनिधित्व करणाऱ्या या साहित्यकृतींना तज्ज्ञांच्या समितीद्वारे निवडण्यात आले आहे.

इतर भाषेतील साहित्य अकादमी पुरस्कार विजेते याप्रमाणे  – ( भाषा व लेखक)
* आसामी- देवब्रत दास
* बांगला -प्रसून बंद्योपाध्याय
* बोडो – सहायसुली ब्रह्म
* डोगरी – खजूर सिंह ठाकुर
* इंग्रजी – नवतेज सरना
* गुजराती  – योगेश वैद्य
* हिंदी -ममता कालिया
* कन्नड – अमरेश नुगडोगी
* कश्मीरी – अली शैदा
* कोकणी – एच एम. पेरनाळ
* मैथिली – महेन्द्र झा
* मलयाळम् – एन. प्रभाकरन
* मणिपुरी – हाउबम नलिनी देवी
* नेपाली -प्रकाश भट्टराई
* ओडिया – गिरिजाकुमार बलियारसिंह
* पंजाबी  – हरजिंदर पाल ‘जिंदर ‘
* राजस्थानी – जितेंद्र कुमार सोनी
* संस्कृत – महामहोपाध्याय साधु भद्रेशदास
* संताली  – सुमित्रा सोरेन ( मरणोत्तर )
* सिंधी –  भगवान अटलानी
* तमिळ  – एस. तमिळसेलवन
* तेलुगु – नंदिनी सिद्धरेड्डी
* उर्दू – प्रितपाल सिंह बेताब

Related Posts

राज्य मंत्रिमंडळाचे सहा मोठे निर्णय: शेतकरी, विद्यार्थी व दिव्यांगांसाठी विकासाची गती!
जळगाव

राज्य मंत्रिमंडळाचे सहा मोठे निर्णय: शेतकरी, विद्यार्थी व दिव्यांगांसाठी विकासाची गती!

April 1, 2026
शेवटच्या क्षणी मोठा ट्विस्ट : ‘लाडकी बहीण’ योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय
राज्य

शेवटच्या क्षणी मोठा ट्विस्ट : ‘लाडकी बहीण’ योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय

April 1, 2026
जळगाव महापालिकेच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा भावपूर्ण सन्मान
जळगाव

जळगाव महापालिकेच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा भावपूर्ण सन्मान

April 1, 2026
भोंदूबाबा खरात अडचणीत: १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी, पत्नी फरार!
क्राईम

भोंदूबाबा खरात अडचणीत: १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी, पत्नी फरार!

April 1, 2026
marhan
क्राईम

किरकोळ वादातून दोन कुटुंबांत हाणामारी; लोखंडी पाइपने मारहाण, परस्परविरोधात गुन्हे दाखल !

April 1, 2026
वडिलांसाठी मुलीचा त्याग: आयुष्यदान देणारी लेक ठरली देवदूत : विजय शिवतारेंची  किडनी प्रत्यारोपण !
जळगाव

वडिलांसाठी मुलीचा त्याग: आयुष्यदान देणारी लेक ठरली देवदूत : विजय शिवतारेंची किडनी प्रत्यारोपण !

March 31, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
राज्य मंत्रिमंडळाचे सहा मोठे निर्णय: शेतकरी, विद्यार्थी व दिव्यांगांसाठी विकासाची गती!

राज्य मंत्रिमंडळाचे सहा मोठे निर्णय: शेतकरी, विद्यार्थी व दिव्यांगांसाठी विकासाची गती!

April 1, 2026
शेवटच्या क्षणी मोठा ट्विस्ट : ‘लाडकी बहीण’ योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय

शेवटच्या क्षणी मोठा ट्विस्ट : ‘लाडकी बहीण’ योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय

April 1, 2026
मराठी भाषेसाठी राजू बाविस्कर यांना साहित्य अकादमीचा पुरस्कार प्रदान

मराठी भाषेसाठी राजू बाविस्कर यांना साहित्य अकादमीचा पुरस्कार प्रदान

April 1, 2026
जळगाव महापालिकेच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा भावपूर्ण सन्मान

जळगाव महापालिकेच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा भावपूर्ण सन्मान

April 1, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group