जळगाव मिरर | ९ ऑगस्ट २०२५
आज रक्षाबंधन सणा निमित्ताने यंदा सलग तिसऱ्या वर्षीही नारीशक्ती बहुउद्देशीय संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी जिल्हा कारागृहातील कैदी बांधवांना रक्षाबंधन सणाच्या निमित्ताने बहिणीच्या मायेचा आधार दिला.
रक्षाबंधन सणाच्या निमित्ताने कारागृहातील कैदी बांधवांना राखी बांधून रक्षाबंधन सण आनंदाने साजरा करण्यात आला. याप्रसंगी सर्वात प्रथम नारीशक्ती बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष सौ मनीषा पाटील यांनी जिल्हा कारागृह अधीक्षक आ. गणेश मानकर साहेब यांना राखी बांधली. तसेच संस्थेच्या सचिव ज्योती राणे, उपाध्यक्ष वंदना मंडावरे सहसचिव किमया पाटील कार्याध्यक्ष नीता विसावे यांनी पोलीस बांधवांना व कैदी बांधवांना राख्या बांधल्या.
हा क्षण अतिशय भावनिक असा ठरला याप्रसंगी राखी बांधतांना कैदी बांधवांच्या डोळ्यातून अश्रू तरळले. घरच्या आठवणी मनात जाग्या झाल्या.बहिणीची आठवण करून देणारा हा सण या कैदी बांधवांसाठी अतिशय अविस्मरणीय असा ठरला. याबद्दल जिल्हा कारागृह अधिक्षकांचे मनःपूर्वक आभार नारीशक्ती संस्थेने मानले.
