
जळगाव मिरर | १४ ऑगस्ट २०२५
दिनांक १३ ऑगस्ट २०२५ शासकीय ग्रामीण रुग्णालय येथे लोकसेवा मंडळतील रुग्णमित्र व स्वयंसेवक यांच्या वतीने आपला हिंदू संस्कृतीतील पवित्र उत्सव रक्षाबंधनाच्या निमित्ताने सर्व कर्मचाऱ्यांची प्रशंसा करण्यासाठी आणि त्यांच्या योगदानाला आदराने गौरवण्यासाठी राख्या बांधून आपल्यातली नाती अधिक घट्ट होण्याच्या दृष्टीने ….. रक्षाबंधन उत्सव साजरा करण्यात आला.
डॉ. गिरीष ठाकुर सर ( वैद्यकीय अधिष्ठाता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय जळगाव) , डॉ धर्मेंद्र पाटील सर (वैद्यकिय अधीक्षक) , सर्व डॉक्टर , परिचारीका , ब्रदर्स तसेच सर्व रुग्णांना राख्या बांधण्यात आल्या.
रुग्णालयात रुग्णमित्र हे शासकीय ग्रामीण रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांना मदत व मार्गदर्शन केले जाते. चिट्टी कुठे काढायची, कोणता ओपीडी नंबर कुठे, कोणता वॉर्ड कुठे आहे, कोणती तपासणी कुठे होते, रक्ताची गरज असेल तर काय करावे अशा विविध गोष्टींची निस्वार्थपणे मदत व मार्गदर्शन करण्यात येते.
यामुळे रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना मानसिक आधार मिळतो. कार्यक्रमासाठी सर्व रुग्णमित्र उपस्थित मा . श्री उज्वलजी चौधरी, श्री गौरव बडगुजर,श्री हरीश तेली, ॲड. स्वाती पाटिल डॉ. नीलिमा सेठिया,श्री हितेश टेकवडे, श्री दिनेश देसाई, श्री कैलाश देवरे, डॉ विकास पाटिल, श्री रत्नाकर चौधरी, श्री राजू पालीवाल, श्री मोहनलाल पालीवाल, श्री ज्ञानेश्वर बारी, श्री चंद्रकांत तायड़े, श्री यशवंत कापडणे, श्री ईश्वर सूर्यवंशी , श्री हेमंत गौड़ , श्री गणेश निंबाळकर , श्री भुषण शिवदे, श्री सुरेश सोनवणे व सर्व रुग्णमित्र




















