जळगाव मिरर | २० जानेवारी २०२४
देशातील अयोध्या येथे २२ जानेवारी रोजी प्रभू श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठेच्या कार्यक्रमासाठी जंगी तयारी सुरु असून प्रत्येक रामभक्त या सोहळ्याला दिवाळी म्हणून साजरा करीत आहे. याचाच एक भाग म्हणून जळगाव शहरात देखील माजी उपमहापौर डॉ.अश्विन शांताराम सोनवणे यांच्या माध्यमातून शहरातील रामभक्तांना बुंदीचा प्रसाद मिळावा याचे काम गेल्या चार दिवसापासून सुरु आहे.
येत्या २२ जानेवारी रोजी जळगाव शहरात देखील प्रभू श्रीराम प्राणप्रतिष्ठेचा दिवस हा दिवाळी म्हणून साजरा होत आहे. यावेळी शहरातील रामभक्तांना माजी उपमहापौर डॉ.अश्विन शांताराम सोनवणे यांच्या माध्यमातून बुंदीचा प्रसाद वाटप करण्यात येणार आहे. आज दि.२० रोजी या प्रसादाचे प्रत्येक प्रभागातील कार्यकर्त्यांच्या माध्यमातून हा प्रसाद पाठविण्यात आला आहे. या कार्यामध्ये शहरातील काही मुस्लीम बांधवांनी देखील मदत करीत असल्याचे डॉ.अश्विन शांताराम सोनवणे यांनी सांगितले आहे.
यावेळी माजी नगरसेवक धीरज सोनवणे, अरविंद चौधरी, ललित लोकचंदानी, विजय सुर्वे, कलीम, संदीप मराठे, किशोर घुले, किशोर ठाकूर, राजदीप, विनोद पाटील, अजय वाणी, सौरभ काशीव, जगन्नाथ गवळी, लतीफ, बंडू देवरे यांचा सहभाग आहे.