जळगाव मिरर | २१ जुलै २०२५
केंद्रीय कार्यकारीणीचे आदेशानुसार मराठासेवासंघाचे विभागिय अध्यक्षपदी(जळगांव धुळे नंदुरबार जिल्ह्यांसाठी) राम पवार यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
यावेळी विचारमंचावर सहसचिव चंद्रशेखर भदाणे,प्रदेश ऊपाध्यक्ष सुरेंद्र पाटील,नाशिक विभागिय अध्यक्ष दिपक भदाणे,सुरेश पाटील,लिनाताई पवार ,आबासाहेब पाटील,ऊपस्थित होते.यावेळी पुर्व जळगांव जिल्हाध्यक्ष डाॕ अनिल पाटील( रावेर लोकसभा मतदारसंघ तालुक्यांसाठी),पश्चिम जळगांव जिल्हाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे (जळगांव लोकसभा मतदारसंघ तालुक्यांसाठी ) खुशाल चव्हाण (जळगांव महानगर व ग्रामिण मतदारसंघसाठी) तसेच विभागिय कार्याध्यक्ष पदी सुमित पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.कार्यक्रमाचे सुरुवातीला राजमाता जिजाऊंच्या प्रतिमेला माल्यार्पण व पुजन मान्यवरांचे हस्ते करण्यात आले.स्मृतिशेष सुर्यकांत सुर्यवंशी(जळगांव ) व शांताबाई पाटील (गाळण )यांना शिवांजली व्यक्त करण्यात आली.
संभाजीब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रविण गायकवाड यांचेवरील भ्याड हल्ल्याचा तिव्र निषेध करण्यात आला.दरम्यान राज्य कर्मचारी पतसंस्थेचे अध्यक्ष पदी निवड झालेले संतोष पाटील यांचा सत्कार करण्यात आला. मराठासेवासंघाचे व ३३ कक्षांचे कार्यप्रणालीवर लिनाताई पवार,चंद्रशेखर भदाणे ,दिपक भदाणे ,सुरेंद्र पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.
जिजाऊ ब्रिगेडच्या पदाधिकारींना नियुक्ती पत्र अध्यक्षांचे हस्ते देण्यात आलीत. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन महानगराध्यक्ष इंजि हिरामण चव्हाण यांनी केले.आभार सुरेंद्र पाटील यांनी मानले,बैठकीला मनपाचे ऊप आयुक्त ऊदय पाटील,अभियंता पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष इंजि एस डी पाटील,गणेश पवार,प्रा.सुनिल गरुड ,प्रा.प्रकाश पाटील,नितिन पाटील,कैलास पाटील,डाॕ सदिप पवार,चंद्रकांत देसले,इंजि सचिन पाटील,यु जी पाटील आदि जिल्हाभरातुन पदाधिकारी व सदस्य प्रचंड संख्येने ऊपस्थित होते.
