जळगाव मिरर | १६ जून २०२३
जामनेर तालुक्यातील एका गावातील १९ वर्षीय तरुणी पाणी घेण्यासाठी जात असतांना एकाने तिचा विनयभंग केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पहूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जामनेर तालुक्यातील एका गावात १९ वर्षीय तरुणी आपल्या परिवारासोबत रहायला आहे. दि. १४ जून रोजी संध्यकाळच्या सुमारास तरुणी गावात पाणी घेण्यासाठी जात असतांना याच गावातील एक तरूणाने तिचा पाठलाग करीत मोबाईल गाणे वाजवत आय लव्ह यु म्हणत तु सुंदर दिसते असे म्हणत हात पकडून तिला दुखापत करीत शिवीगाळ करीत विनयभंग केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी संशयित आरोपी आकाश खरात(वय २३) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संजय बनसोडे हे करीत आहेत.