जळगाव मिरर | १७ जुलै २०२५
रावेर शहरात शिक्षणासाठी खेड्यांवरून मुलामुलींची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. बसने ये-जा करणाऱ्या मुलींची काही मुले छेड काढतात. अशा तक्रारी येत होत्या नुकत्याच शाळा सुरु झाल्या आहे. दुपारी १२ वाजता शाळा सुटल्यावर टवाळखोर मुले बस स्टॅन्डमध्ये गर्दी करतात.
सविस्तर वृत्त असे कि, दि. १६ जुलै रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास एका शाळकरी मुलाने एका मुलीची छेड काढली. मुलींनी थेट पोलीस स्टेशनलाच फोन लावला. येथील पोलीस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल यांनी तात्काळ बस स्टॅन्ड गाठले आणि या मुलाला ताब्यात घेतले. पोलीस स्टेशनला आणून कारवाई करून या मुलाला त्याच्या आईच्या ताब्यात देऊन आई-वडिलांना सुद्धा समज देण्यात आली. यापुढे कोणीही अशी मुलांची छेड काढत असेल त्याची गय केले जाणार नाही. कायदेशीर कारवाई केली जाईल, असे पोलीस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल यांनी पुण्यनगरीला सांगितले.
