
मेष – आजचा दिवस मेष राशींच्या लोकांसाठी चांगला असणार आहे. आरोग्यात सुधारणा होईल. तुमची निर्णय क्षमता सुधारेल. आज फळांचे सेवन केल्यास फायदेशीर ठरेल. बोलताना थोडा संयम ठेवा. आज दुसऱ्याचे ऐकू नका, स्वतःवर विश्वास ठेवा.
वृषभ – वृषभ राशीच्या लोकांनी आरोग्याची काळजी घ्यावी. विशेषत: गरोदर महिलांनी काही दिवस विश्रांती घ्यावी. आर्थिक स्थितीत सुधारणा होण्यास मदत होईल. नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे. वृषभ राशींच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे.
मिथुन – मिथुन राशींच्या लोकांची आर्थिक स्थिती सुधारेल. या राशींच्या लोकांनी आरोग्याची काळजी घ्यावी. वाहन चालवताना काळजी घ्यावी. तुमचा दिलेला सल्ला अनेकांना फायदेशीर ठरेल. तोच सल्ला स्वतःसाठी देखील वापरा. तुमचा आज प्रवास घडण्याची शक्यता आहे.
कर्क – आज तुमच्या मान सन्मानात वाढ होईल. बोलताना थोडा संयम ठेवा. शब्द जपून वापरा. लोक तुमच्या सल्ल्याचे पालन करतील. आपले ध्येय निश्चित करा, गोंधळून जाऊ नका. अध्यात्माशी जोडले तर मार्ग मोकळा होईल. आज कोणत्याही प्रकारचे वादविवाद टाळा.
सिंह – आरोग्याशी असलेल्या समस्या आज कमी होतील. अनेक समस्यांपासून आज आराम मिळेल. चांगले अन्न खाल्ल्याने आरोग्य चांगले राहील. कोणतीही गुंतवणूक करणे आज टाळा. अनावश्यक खर्च करू नका. वैयक्तिक आयुष्यात कोणत्या ना कोणत्या कारणामुळं मानसिक विचलीत होते, त्यामुळं संयमाने काम करा. तणावापासून दूर राहा. जीवन हळूहळू सुधारणा होईल.
कन्या – कन्या राशींच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला जाणार आहे. या राशींच्या लोकांची आर्थिक स्थिती सुधारेल. नैराश्य टाळा, सकारात्मक विचार ठेवा. पती-पत्नी मिळून आज नवीन व्यवसाय सुरु करू शकता. नवीन घर खरेदी होण्याची शक्यता आहे. आजूबाजूच्या लोकांपासून सावध रहा.
तूळ – आजच्या दिवशी कोणताही महत्वाचा निर्णय घेऊ नका. आज तुमच्या आयुष्यात मोठा बदल होणार आहे, त्यासाठी तयार रहा. वाईट गोष्टीपासून स्वतःचे रक्षण करा. आज स्वतःसाठी थोडा वेळ काढा. व्यायाम आणि ध्यानावर लक्ष केंद्रित करा.
वृश्चिक – परदेशात प्रवास केल्याचे अनेक फायदे होतील. तुमच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होईल.. कोणाच्याही बोलण्यावर आंधळेपणानं विश्वास ठेवू नका. हितचिंतकांचे म्हणणे ऐकून घ्या. विचार करुन निर्णय घ्या. तुमच्या आरोग्याची काळजी घ्या. कोणत्याही चुकीच्या पद्धतीचा अवलंब करू नका.
धनु – नोकरीच्या ठिकाणी असलेल्या राजकारणापासून दूर राहा, अन्यथा नुकसान होऊ शकते. वैयक्तिक जीवनात आनंद मिळेल. जोडीदाराशी असणारे संबंध सुधारतील. नवीन संधी उपलब्ध होतील. प्राणायाम, व्यायाम करा. आरोग्य चांगले राहील.
मकर – तुमच्या कामात आज यश मिळेल. बाहेरच्या खाण्यापासून दूर राहा. प्रवासातून आर्थिक लाभ होईल. वैयक्तिक जीवनात गोडवा राहील निर्णय घेण्यासाठी आजचा दिवस चांगला राहील.
कुंभ – आरोग्याची विशेष काळजी घ्या. कुटुंबात कोणाची प्रकृती बिघडली असेल तर लगेच उपचार करा. स्वतःवर विश्वास ठेवा. पूर्ण समज देऊन पुढे जा, घाबरू नका. महिलांसाठी आजचा दिवस खूप फायदेशीर आहे. नवीन संधी आणि आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे.
मीन – आज संयमाने काम करा. दारुचे सेवन अजिबात करू नका. भागीदारीत व्यवसाय करणाऱ्यांना आर्थिक लाभ मिळू शकतो. आज वैयक्तिक आयुष्यात काही मोठे निर्णय घ्यावे लागतील. प्रतिकूल परिस्थितीला खंबीरपणे सामोरे जा.