
धरणगाव : विनोद रोकडे
धरणगाव शहरातील वाढीस घरपट्टी चि अपील सुनावणी सनदर्भात दिनांक १५ व १६ डिसेंबर या दोन दिवस सुनावणी साठी नगरपालिका ला एकूण ३७४७ अर्ज प्राप्त झाले होते परंतु अपील सुनावणी साठी 2588 वर सक्षम सुनावणी दिघेश तायडे नगर रचनाकार सहाय्यक संचालक नगररचना जळगांव तथा मूल्यनिर्धारन आधिकारी धरणगाव नगरपालिका याचा उपस्थित झाली.
यावेळी शहरातील नागरिकांची उपस्थिती पाहून दिनांक १६ डिसेंबर रोजी ५.३०,पर्यत वेळ होती परंतु नागरिकांची गर्दी होत असल्याने रात्री 8-वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात आली यावेळी अमोल मगरे रचना सहाय्यक, सौरभ बागड रचना साहाय्यक , प्रशांत लोहार लिपिक यांनी अपील सनदर्भात अर्ज वर सुनावणी घेतली यावेळी धरणगाव नगरपालिकाचे कर निर्धारण व प्रशासक अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली लिपिक अनिल पाटील, संजय शुक्ला, भगवान माळी, सिकंदर पवार, दिपक वाघमारे, जितेंद्र वाघमारे, राजू माळी, प्रवीण देशपांडे, गणेश पाटील, शिरीष पाटील, महेश चौधरी, मुजजमिल शेख, प्रशांत चौधरी, वसंत चव्हाण, संभाजी पवार, सुरेश चौधरी, नारायण माळी, युवराज चौधरी, आबीत शेख सह नगरपालिकाचे कर्मचारी वर्ग यांनी अपील सुनावणी सुरळीत पार पडली.




















