जळगाव मिरर | ७ ऑक्टोबर २०२३
प्रत्येक व्यक्ती आपल्या भविष्यासाठी अनेक स्वप्न बघत असता त्याचप्रमाणे दर महिन्याच्या शेवटी सर्व खर्च काढून उरेल ती रक्कम अनेक लोक जतन करीत असता, हे जतन केलेले पैसे नक्कीच आपण आपल्या निवृत्तीनंतर असो कि म्हातारपणात खर्चात येऊ शकतात याच हिशोबाने जतन करीत असतो पण नेहमीच आर्थिक बचत योग्य मार्गातून जर झाली तर निश्चितच तुम्हाला चांगला फायदा देखील होऊ शकतो.
तुम्ही जर आतापासून वृद्धापकाळासाठी आर्थिक नियोजन केलं नाही, तर सेवानिवृत्तीनंतर तुम्हाला तुमचे जीवन जगताना अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. यातच आज आम्ही तुम्हाला भारत सरकारच्या एका अतिशय जबरदस्त योजनेबद्दल सांगणार आहोत. अटल पेन्शन योजना असे या योजनेचे नाव आहे. ही योजना देशात खूपच लोकप्रिय आहे. यामध्ये गुंतवणूक करून तुम्हाला अनेक फायदे मिळू शकतात. याचबद्दल अधिक माहिती जाणून घेऊ…
तुम्ही अटल पेन्शन योजनेसाठी १८ ते ४० वयोगटातील अर्ज करू शकता. नोंदणीनंतर तुम्हाला योजनेत किती पैसे गुंतवावे लागतील? ही रक्कम तुम्ही योजनेसाठी कोणत्या वयात अर्ज करत आहात? त्याआधारे निर्णय घेतला जाईल.
तुम्ही वयाच्या १८ व्या वर्षी या योजनेसाठी अर्ज केल्यास. अशा परिस्थितीत तुम्हाला दरमहा २१० रुपये गुंतवावे लागतील. जर तुम्ही आणि तुमची पत्नी मिळून दररोज ७+७ = १४ रुपये वाचवत असाल आणि तुम्ही ६० वर्षांचे होईपर्यंत प्रत्येक महिन्याला २१० + २१० = ४२० रुपये गुंतवले, तर वयाच्या ६० वर्षांनंतर पती-पत्नी दोघांनाही दरमहा दहा हजार रुपये पेन्शन मिळू शकते. तुम्ही
https://enps.nsdl.com/eNPS/NationalPensionSystem.htm वर भेट देऊन या योजनेसाठी ऑनलाइन अर्ज करू शकता. अटल पेन्शन योजनेत अर्ज करण्यासाठी तुमच्याकडे आधार कार्ड, मोबाइल नंबर, ओळखपत्र, कायम पत्ता पुरावा, पासपोर्ट आकाराचा फोटो, बँक खात्याचे पासबुक इत्यादी कागदपत्रे असणे आवश्यक आहे.