जळगाव मिरर | १० जानेवारी २०२४
मागील वर्षात सोन्यासह चांदीच्या दरात अनेक चढ उतार पाहायला मिळाले मात्र जानेवारीच्या सुरुवातीला ग्राहकांना दिलासा दिला. 3 जानेवारी सोने इतकेच घसरले. 4 जानेवारी 440 रुपयांची घसरण झाली. 5 जानेवारीला सोने 130 रुपयांनी घसरले. 6 जानेवारी रोजी त्यात 20 रुपयांची वाढ झाली होती. 8 जानेवारीला किंमती 220 रुपयांनी उतरल्या. 9 जानेवारीला शंभर रुपयांनी किंमत कमी झाली. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 57,850 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 63,100 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
चांदीत या वर्षाच्या सुरुवातीला घसरण दिसून आली. 3 जानेवारी रोजी 300 रुपयांची घसरण झाली. 4 जानेवारीला चांदी 2000 रुपयांनी स्वस्त झाली. 8 जानेवारी रोजी 200 रुपयांची घसरण झाली. 9 जानेवारी किंमतीत तितकीच वाढ झाली. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 76,600 रुपये आहे.
सोन्याच्या किंमती वधारल्या. तर चांदी पण महागली आहे. 24 कॅरेट सोने 62,415 रुपये, 23 कॅरेट 62,165 रुपये, 22 कॅरेट सोने 57172 रुपये झाले. 18 कॅरेट 46,811 रुपये, 14 कॅरेट सोने 36,513 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. एक किलो चांदीचा भाव 71,840 रुपये झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.