जळगाव मिरर | २३ मार्च २०२४
गेल्या काही वर्षापासून देशात सोन्यासह चांदीच्या दरात मोठी वाढ झाल्याचे दिसत होते मात्र न्याचे भाव गुरुवारी ६७ हजार ३०० रुपयांवर पोहचले, मात्र दुसऱ्याच दिवशी शुक्रवारी त्यात ९०० रुपयांची घसरण झाली. त्यामुळे सोने ६६ हजार ४०० रुपये प्रतितोळ्यावर आले.
यासोबतच गुरुवारी ७६ हजारांवर पोहचलेल्या चांदीच्या भावात शुक्रवारी एक हजार ५०० रुपयांची घसरण होऊन ती ७४ हजार ५०० रुपये प्रतिकिलोवर आली.. अमेरिकेतील बँकिंग स्थितीमुळे सोने- चांदीचे भाव वाढत आहे. मात्र ही वाढ खूप मोठ्या प्रमाणात झाल्याने शुक्रवारी त्यात घसरण झाली व भाव स्थिरावत असल्याचे सुवर्ण व्यावसायिकांचे म्हणणे आहे