जळगाव मिरर | ३० जानेवारी २०२६
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची पुण्यतिथी खान्देश युनियन एज्युकेशन सोसायटी संचलित कै. गि. न. चांदसरकर पूर्व प्राथमिक व प्राथमिक विद्यामंदिर, साने गुरुजी कॉलनी, जळगाव येथे दिनांक 30 जानेवारी 2026 रोजी श्रद्धापूर्वक साजरी करण्यात आली.
या कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. यानंतर शाळेतील विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणातून महात्मा गांधी यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला. सत्य, अहिंसा आणि देशसेवेचे मूल्य विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याचा या कार्यक्रमाचा उद्देश होता.
यावेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री. श्याम ठाकरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना महात्मा गांधी यांच्या विचारांचे आजच्या काळातील महत्त्व स्पष्ट केले. गांधीजींच्या जीवनातील साधेपणा, राष्ट्रभक्ती आणि सामाजिक समतेचा संदेश विद्यार्थ्यांनी आत्मसात करावा, असे आवाहन त्यांनी केले.
या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेचे मुख्याध्यापक श्री. श्याम ठाकरे सर, श्रीमती जयश्री पाटील, श्री. स्वप्निल भोकरे, सौ. शारदा चौधरी, सौ. दीपिका सोनवणे, सौ. रोहिणी निकम, सौ. उज्वला भामरे, सौ. सुनिता पाटील, सौ. मनीषा वाघ, सौ. प्रिया कोपरकर आणि श्री. भूषण अमृतकर यांनी विशेष परिश्रम घेतले.




















