जळगाव मिरर | २७ डिसेंबर २०२३
राज्यातील अनेक महामार्गावर अपघाताच्या अनेक घटना घडत आहे तर दुसरीकडे वर्ष अखेरीस अनेक नागरिक पर्यटन व तीर्थस्थळी जात असल्याची देखील लगभग सुरु असल्याने नुकतेच शिर्डी येथून साईबाबांचे दर्शन घेवून गावी निघाले असतांना त्यांच्या चारचाकीला भीषण अपघात घडला या अपघातात ७ जण गंभीर जखमी झाल्याचे समजते.
मिळालेल्या माहितीनुसार, वाशिम जिल्ह्यातील कारंजा तालुक्यातील पोहाजवळ लोकेशन १९० वर कारच्या समोर अचानक रोही आल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. गाडीसमोर रोही आल्याने चालकाना गाडीचा अचानक ब्रेक मारला. मात्र त्यामुळे गाडी अनियंत्रित झाली आणि डिव्हायडरला जाऊन धडकली. गाडीचे दोन्ही टायर देखील फुटले.
गाडीतील जखमी हे चंद्रपूरचे राहणारे आहेत. सर्वजण शिर्डी येथून साईबाबांचे दर्शन घेऊन चंद्रपूरला परतत होता. मात्र वाटेतच त्यांच्या वाहनाला अपघात झाला. अपघाताची माहिती मिळताच समृद्धी महामार्गावरील कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आणि जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.