जळगाव मिरर | २० ऑगस्ट २०२४
राष्ट्रवादी महिला काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे या मुक्ताईनगर मतदारसंघाला आपला एक परिवार मानुन आपले राजकीय सामाजिक कार्य करताना नेहमी दिसुन येतात यामुळे मतदारसंघातील अनेक परिवारां सोबत त्यांचे पारिवारिक जिव्हाळ्याचे संबंध निर्माण झाले आहेत याच ऋणानुबंधातून रक्षाबंधनाचे औचित्य साधून बोदवड ,मुक्ताईनगर, सावदा आणि इतर ठिकाणी पक्षाच्या कार्यकर्ते, पदाधिकारी यांना रक्षाबंधनाला राखी बांधून रक्षाबंधन साजरे केले यावेळी उपस्थित हजारो पदाधिकारी, कार्यकर्त्यांना रोहिणी खडसे यांनी औक्षण करून राखी बांधली.
याप्रसंगी रोहिणी खडसे म्हणाल्या स्व.निखिलदादांना जाऊन दहा वर्षे झालीत पण एकही दिवस त्यांच्या आठवणी शिवाय जात नाही. विशेषतः रक्षाबंधन आणि भाऊबीजेला दादांची प्रकर्षाने आठवण येते. आयुष्याच्या वाटेवर प्रत्येक क्षणाक्षणाला पाठीराखा असणाऱ्या स्व.निखिल दादांची कमी जाणवते परंतु त्याचवेळी माझ्या प्रत्येक सुख दुःखात माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणाऱ्या मतदारसंघातील प्रत्येक कार्यकर्त्यामध्ये स्व.निखिलदादांचेच दर्शन घडते. ‘ताई काळजी नका करू मी कायम तुमच्यासोबत आहे’ या कार्यकर्त्यांचा आश्वासक शब्दात जीवनातील प्रत्येक संकटांना सामोरे जाण्याचे बळ मिळते. कार्यकर्त्यांच्या याच पाठबळावर मी माझी राजकीय सामाजिक वाटचाल करत आलेली आहे माझ्या राजकीय सामाजिक जडणघडणीत मोलाची साथ देणाऱ्या कार्यकर्ता बंधूंचे आज रक्षाबंधनानिमित्त औक्षण केले व त्यांच्या हातावर राखी बांधून सर्वांना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या आणि त्यांच्या मंगल निरामय दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली.
सर्व कार्यकर्ते बंधूंनी आतापर्यंत खंबीर साथ, पाठबळ दिले त्याच पाठबळाच्या जोरावर मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघाला सर्वांगिण क्षेत्रात विकासाच्या वाटेवर नेण्यासाठी राजकीय रणांगणात विरोधकांशी लढण्यासाठी आज मी सज्ज आहे. त्यासाठी कार्यकर्त्यानी आतापर्यंत दिलेली खंबीर साथ, बहिणी प्रती असलेले प्रेम, पाठींबा असाच कायम ठेवावा अशी अपेक्षा यावेळी रोहिणी खडसे यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना व्यक्त केली. रक्षाबंधनाच्या या सणातून रोहिणी खडसे यांचे मतदारसंघात अनेक परिवाराशी नाते दृढ होताना दिसत आहे.
फोटोओळी – सावदा येथील माजी नगराध्यक्ष राजेश वानखेडे यांचे औक्षण करून राखी बांधताना रोहिणी खडसे.