जळगाव मिरर | ९ जुलै २०२३
दि 6 जुलै रोजी बोदवड तालुक्यातील कुऱ्हा हरदो, धोनखेडा, शेवगा परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला या पावसात घरांची पडझड झाली असून शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतीचे बांध वाहून गेले आहेत ठिबक संचाच्या नळ्या वाहून गेल्या आहेत,काही शेतकऱ्यांच्या शेतात पाणी तुंबले आहे तर लागवड केलेले पिक शेतातील मातीसहित वाहून गेले आहे यामुळे शेतजमीन पेरणी अयोग्य झाली आहे शेतकरी बांधवांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे
दि 8 रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या रोहिणी खडसे यांनी नुकसानग्रस्त घरांची आणि शेतीची पाहणी केली यावेळी त्यांनी तहसीलदार, तालुका कृषी अधिकारी व पंचनामे करणारे अधिकारी यांच्या सोबत चर्चा करून सर्व शेतीचे सरसकट पंचनामे व्हावे अशी मागणी केली आमदार एकनाथराव खडसे यांच्या माध्यमातून नुकसानभरपाई मिळण्यासाठी सरकारकडे पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले यावेळी त्यांच्या समवेत बाजार समिती उपसभापती ज्ञानेश्वर पाटील, रामदास पाटील, भागवत टिकारे,डॉ ए. एन. काजळे ,विजय चौधरी, गणेश पाटील,वामन ताठे, प्रमोद फरफट,प्रदिप बडगुजर,मयुर खेवलकर ,अशोक माळी, केसरीलाल फरफट, सुरातसिंग पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते