
जळगाव मिरर । १७ डिसेंबर २०२२
डिसेंबर महिन्यात प्रत्येक शाळेमध्ये स्नेह संमेलन असले कि शाळेतील वातावरण अगदी आनंदी असते, विध्यार्थी नुसता जल्लोष करीत असतात, जळगाव शहरातील न्यू एरा एज्युकेशन सोसायटी संचालित रोझलँड इंग्लिश मीडियम हायस्कूलमध्ये हि जल्लोषात वार्षिक स्नेह संमेलन मोठ्या जल्लोषात संपन्न झाले.
शहरातील न्यू एरा एज्युकेशन सोसायटी संचालित रोझलँड इंग्लिश मीडियम हायस्कूलमध्ये दि १७ रोजी शनिवार सकाळी १०.३० ते १२.३० वाजे दरम्यान वार्षिक स्नेह संमेलनाचा सांस्कृतिक कार्यक्रम रंगला यावेळी यु.एस. ए.हून आलेल्या टीमचा स्वागत सोहळा हि करण्यात आला. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून डॉ.रूपाली वायकोळे, ईएफएल विद्यापीठचे सेवानिवृत्त कुलगुरू डॉ.वृद्धगिरी गणेशन यांची विशेष उपस्थिती लाभली. प्रमुख पाहुण्याचे स्वागत यावेळी संस्थेच्या अध्यक्ष सौ. रोजमीन खिमानी-प्रधान यांनी केले. सांस्कृतिक कार्यक्रमासाठी प्राथमिक वर्गाची थीम “आपले पर्यावरण संवर्धन” व माध्यमिक वर्गाची थीम “विविधतेत एकता” याप्रकारे विविध राज्यांतील नृत्ये व त्याच्या संस्कृतीचे सादरीकरण करण्यात आले. या सांस्कृतिक कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी उत्साहात सहभाग घेतला. कार्यक्रम यशस्वीते साठी संस्थेचे अध्यक्ष सौ.रोजमीन खिमाणी-प्रधान यांनी मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.सोनिका सारस्वत-मुजुमदार आणि सौ.नेहा जोशी यांनी उत्कृष्टपणे केले. यावेळी शाळेच्या प्रांगण पालकांनी भरगच्च भरलेले होते. यावेळी पालकानी टाळ्या वाजवीत मुलांचे कौतुक केले.
पर्यावरणासह सामाजिक संदेश ठरले आकर्षक
शाळेतील विद्यार्थिनी वार्षिक स्नेहसंमेलनात काही नाटिका सादर केल्या यामध्ये पर्यावरण जनजागृती व सध्याच्या युगात मोबाईलला किती महत्व आहे व मोबाईल किती हानिकारक आहे. या हि घटना त्यांनी नाटिकेमधुन पालकांची दाद मिळवली.



















