
जळगाव मिरर | ९ डिसेंबर २०२५
दिनांक ६ डिसेंबर 2025 रोजी सायंकाळी ७ वाजता सम्यक बौद्ध विहार तर्फे परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त भव्य अभिवादन सभा आयोजित करण्यात आलेली होती.
या सभेमध्ये प्रथम डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून सामूहिक त्रिशरण पंचशीला ग्रहण करून बाबासाहेबांना मानवंदना देण्यात आले त्यानंतर या सभेमध्ये मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले कु.अंकिता गजरे,कु.दिपाली सुकलाल पेंढारकर या विद्यार्थिनींनी आपलं मनोगती भाषण केले त्यानंतर कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते एडवोकेट माईसाहेब पाटील यांनी त्यांचं मार्गदर्शन पर मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती जळगाव शहराचे आमदार माननीय राजू मामा भोळे या ठिकाणी येऊन सम्यक बौद्ध विहाराची पाहणी केले असता त्यांनी बौद्धविराच्या एक रूम बांधण्यासाठी एक लाख रुपयाचा निधी जाहीर केला.
याप्रसंगी सर्व मान्यवरांनी त्यांचा अभिनंदन केले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मा. विजय भाऊ सुरवाडे, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आयु. जितु भाऊ सोनवणे तसेच आभार रवींद्र बाविस्कर साहेब यांनी केले तसेच या कार्यक्रमात कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सम्यक बौद्ध विहार समितीचे जोहरे काका,सपकाळे बाबा,पिंटू भाऊ सपकाळे, यशवंत मोरे सर,रवी निकम साहेब,अशोक सोनवणे, रोहित शिरसाट यांनी मेहनत घेतली तसेच या अभिवादन सभेला परिसरातील सर्व भीम अनुयायांनी याठिकाणी उपस्थिती दिली.




















