
जळगाव मिरर / २३ मार्च २०२३
राज्यात एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेसोबत बंड केल्यानंतर अर्धी शिवसेना शिंदे गटात दाखल झाल्यानंतर शिवसेनेच्या नावासह धनुष्यबाण एकनाथ शिंदे यांना मिळाले यानंतर थेट ठाकरे गटाच्या नेते संजय राऊत यांनी गौप्यस्फोट केला आहे.
संजय राऊत म्हणाले कि, आम्हालाही सांगण्यात आले कशाला राहताय? काय राहिलेय? तुम्ही या आमच्याकडे. मी म्हटले, मी थुंकतो तुमच्या ऑफरवर. मी बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे आणि आमची शिवसेना यांच्याशी बेईमानी करणार नाही. थुंकतोय तुमच्या ऑफरवर या भाषेत मी बोललो, शिवसेनेने खासदार संजय राऊत यांची संसदीय नेतेपदावरून हकालपट्टी करत त्यांच्या जागी गजानन किर्तीकर यांची नियुक्ती केली आहे. त्यांच्या नियुक्तीचे अधिकृत पत्र लोकसभा अध्यक्षांना सोपवण्यात आले आहे. याबाबत प्रतिक्रिया देताना संजय राऊत यांनी हा आरोप केला आहे.
राऊत म्हणाले, पदे आज आहेत उद्या नाही. असे अनेक पदे आम्ही ओवाळून टाकू. आम्ही स्वाभिमानी आहोत. निष्ठावंत आहोत. निष्ठा राखण्यासाठी काही जात असेल तर मी गमवायला तयार आहे. माझ्या पक्षाने मला भरपुर दिले आहे. त्यामुऴे एखाद्या पदासाठी लाचारी पत्करणारा संजय राऊत नाही. मी खोके घेतले असते तर त्या पदावर असतो. राऊत म्हणाले, आम्ही खोके घेतले असते आणि गुडघे टेकले असते तर आज त्या पदावर राहिलो असतो. मात्र बाळासाहेब ठाकरेंनी माझ्यावर जे संस्कार केले ते निष्ठेचे आणि इमानदारीचे आहेत. पदासाठी, सत्तेसाठी गुडघे टेकण्यासाठी नाहीत. पदे आज गेली उद्या परत येतील. तेवढी हिंमत आमच्या पक्षात आणि नेतृत्वात आहे.