
अमळनेर : विक्की जाधव
अमळनेर नगरपालिका व अमळनेर महिला मंच यांच्यावतीने सावित्रीबाई महिला महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे. अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.
यावेळी मुख्याधिकारी प्रशांत सरोदे, महिला मंचच्या डॉ अपर्णा मुठे, तिलोत्तमा पाटील, सरोज भांडारकर, कांचन शाह, शहर अभियान व्यवस्थापक चंद्रकांत मुसळे, समुदाय संघटक उज्वला पाटील, तुकाराम भोई आदी उपस्थित होते. महिला मंचच्या सदस्या यावेळी खूप उत्साही होत्या.यंदा देखील दर्जेदार कार्यक्रम होणार आहेत. विविध स्टोल लावून बचत गटांना उत्पादन विक्रीस वाव देण्यात येणार आहे. विविध कार्यक्रम घेण्यात येतील गेल्या काही वर्षात उत्साहात कार्यक्रम झाले, हा उत्सव पण तसाच होईल, सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन प्रशांत सरोदे यांनी केले. तर महिला मंचच्या अध्यक्षा अपर्णा मुठे यांनी माहिती देतांना सांगितले की यावेळी सलग तीन वर्षे महिला उत्सव साजरा झाला आहे, सर्व जाती धर्मिय महिलांचा चा सहभाग असतो. काही स्पर्धांची तयारी करावी लागते म्हणून लवकर सुरुवात करीत आहोत, 25 डिसेंम्बर ते 13 जानेवारी या काळात विविध कार्यक्रम घेण्यात येणार आहेत.
स्टॉल चे उद्घाटन आणि स्टोल फक्त महिलांना, वादविवाद स्पर्धा, रांगोळी स्पर्धा वादविवाद स्पर्धा, भजन स्पर्धा, वॉकेथॉन स्पर्धा, नृत्य स्पर्धा, समूह नृत्य अशा विविध स्पर्धा यात ठेवण्यात येणार आहेत. काही महिला निवडून करून त्यांच्याच कार्यक्रमाची रेलचेल असणार आहे. नृत्य स्पर्धा, समूह नृत्य आणि विविध स्पर्धा यात ठेवण्यात येणार आहेत. काही निवडक महिला ऑर्केस्ट्रा साजरा करणार आहेत. 3 रोजी घेणार आहोत, उच्च पदस्थ महिलांचा गौरव यासह विविध कार्यक्रमाची मेजवानी असणार आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन-प्रशासन अधिकारी संजय चौधरी यांनी केले तर आभार प्रदर्शन समूह संघटक तुकाराम भोई यांनी केले.




















