
धरणगाव : विनोद रोकडे
3 जानेवारी रोजी इतिहासात अनेक महत्त्वाच्या घटना घडल्या होत्या. त्यापैकी एक म्हणजे भारतातील पहिल्या स्त्री शिक्षिका, महान समाजसुधारक सावित्रीबाई फुले यांची जयंती आहे. सावित्रीबाईंचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी महाराष्ट्रातील नायगाव येथे झाला. सावित्रीबाई फुले या देशातील पहिल्या महिला शिक्षिका मानल्या जातात. सावित्रीबाई फुले यांची आज १९२ वी जयंती. धरणगावं नगरपालिका येथे साजरी करण्यात आली.
यावेळी नगरपालिका चे मुख्याधिकारी तथा प्रशासक जनार्धन पवार यांनी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून पूजन केले यावेळी उपस्थित कार्यालयीन अधिकारी संजय मिसर लेखापाल ज्ञानेश्वर दिघोडे कर निरीक्षक प्रणव पाटील आस्थापना प्रमुख युवराज तळेराव , किशोर खैरनार विक्रांत चौधरी तुषार सोनार संजय शुक्ला दीपक वाघमारे नारायण माळी युवराज चौधरी भगवान माळी केशव पैठणकर प्रशांत चौधरी विनय आदी कर्मचारी व अधिकारी वर्ग उपस्थित होते.




















