
जळगाव मिरर | २१ ऑगस्ट २०२५
धुळे जिल्हा रग्बी संघातील मुलींच्या संघामध्ये एस.आर.बी इंटरनॅशनल स्कूल, दहिवद (ता. शिरपूर) येथील खालील खेळाडूंची निवड झाली आहे – खुशी पावरा, यशोदा पावरा, प्रियंका बिलकुडे, जानवी पावरा, निकिता पावरा, श्वेता पावरा, स्नेहा वळवी आणि दिव्या पावरा.
विशेष म्हणजे धुळे जिल्हा मुलींच्या रग्बी संघाच्या कर्णधारपदी यशोदा पावरा हिची निवड करण्यात आली आहे.
धुळे जिल्हा रग्बी संघाचा १७ वर्षे आतील मुलींचा संघ शिवछत्रपती क्रीडा संकुल, बालेवाडी, पुणे येथे २२ ते २३ ऑगस्ट २०२५ रोजी होणाऱ्या राज्यस्तरीय रग्बी स्पर्धेत सहभागी होणार आहे. या स्पर्धेसाठी धुळे जिल्हा रग्बी संघटनेचे अध्यक्ष ॲड. यशवंतराव जाधव आणि सचिव डॉ. भूपेंद्र मालपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली संघाची निवड करण्यात आली असून मुख्य प्रशिक्षकपदी अमोल पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
एस.आर.बी इंटरनॅशनल स्कूल, दहिवद (ता. शिरपूर) येथील खेळाडूंची निवड झाल्याबद्दल संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती भाग्यलक्ष्मी बाविस्कर, चेअरमन डॉ. धीरज बाविस्कर, संचालिका सौ. मानसी बाविस्कर, प्राचार्य सुभाषनाथ पटले, पूर्व प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ. निवेदिता दुबे, क्रीडाविभाग तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारीवृंद यांनी अभिनंदन व कौतुक केले आहे.




















