जळगाव मिरर | ३ जुलै २०२५
जळगांव जिल्ह्यातील महिला बचत गटांनी तयार केलेल्या विविध उत्पादनांना बाजारपेठ मिळावी व महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करता यावे, या उद्देशाने जिल्हा परिषद व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या माध्यमातून ‘बहिणाबाई मॉल’ हा अभिनव उपक्रम सुरु करण्यात येत आहे.
या बहिणाबाई मॉल चे भूमिपूजन दि. 3 जून 2025, गुरुवार रोजी जामनेर येथील वाकी रोड परिसरात माजी नगराध्यक्ष साधना महाजन यांच्या हस्ते संपन्न झाले.
या प्रसंगी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल (IAS), जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक आर. एस. लोखंडे, भाजपचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर, जे. के. चव्हाण तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते. मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी यावेळी मार्गदर्शन करताना सांगितले की,
“जळगांव जिल्ह्यातील महिला बचत गट अत्यंत चांगले कार्य करत असून त्यांच्या उत्पादनांना बाजारपेठ मिळवून देणे हे काळाची गरज आहे. ‘बहिणाबाई मॉल’च्या माध्यमातून या गटांनी तयार केलेल्या दर्जेदार वस्तूंना थेट ग्राहकांपर्यंत पोहोचवता येणार असून, महिला सक्षमीकरणाचा हा महत्वाचा टप्पा ठरेल.”
बहिणाबाई मॉल हा केवळ एक विक्री केंद्र नसून, महिला बचत गटांच्या उत्पादनांना एक सन्मान मिळवून देणारे व्यासपीठ आहे. या उपक्रमामुळे ग्रामीण महिलांचा आत्मविश्वास वाढून त्यांच्या उत्पादन क्षमतेला व्यापक स्वरूप मिळणार आहे
