जळगाव मिरर | २ नोव्हेंबर २०२५
जळगाव शहरातील एका वृत्तपत्रात कार्यरत असलेले वरिष्ठ पत्रकार हे आज दुपारी कार्यालयात येत असताना तीन जणांच्या टोळक्यांनी समोरून येत हल्ला केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. या प्रकरणी शहर पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
सविस्तर वृत्त असे कि, शहरातील बळीराम पेठेत असलेल्या दैनिक लोकशाही कार्यालयाच्या बाहेर वरिष्ठ पत्रकार दीपक कुलकर्णी हे आज दुपारी ३.३० वाजेच्या सुमारास कार्यालयात पायी जात असताना मागून आलेल्या तीन जणांच्या टोळक्यांनी त्यांच्या काचेची बॉटल मारून प्राणघातक हल्ला केला आहे. त्यांनी तात्काळ सावध भूमिका घेतल्याने काचेची बॉटल त्यांच्या मानेवर लागली असून त्यांच्यावर लागलीच जिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले त्यानंतर जळगाव शहर पोलीस स्थानकात दुपारी तक्रार देण्यात आली असून या प्रकरणी पुढील तपास पोलीस करीत आहे. तर या प्राणघातक हल्ला करणारे संशयित तीन आरोपी सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाले आहे.




















