जळगाव मिरर | १२ नोव्हेबर २०२४
२४ वर्षीय आई आणि तिच्या नवजात बालकाचा मृत्यू झाल्यानंतर कुटुंबीयांनी व्ही. एन. देसाई रुग्णालयात गोंधळ घातला. वाढती गर्दी आणि कुटुंबीय आक्रमक झालेले पाहून रुग्णालयातील डॉक्टरांनी स्वतःला ओपीडी कक्षात कोंडून घेतले. मात्र, पोलिसांनी घटनास्थळी येऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. ही घटना सोमवारी घडली. रुग्णालयातील डॉक्टरांचा निष्काळजीपणा आणि औषधांचा अतिरेक झाल्याने ही घटना घडल्याचा आरोप मृताच्या नातेवाईकांनी केला. रुग्णालय प्रशासनाने मात्र हा आरोप फेटाळून लावला.
मिळालेल्या माहितीनुसार, विलेपार्ले आंबेडकर नगर येथील रहिवासी अर्चना सलीमठ (२४) असे मृत आईचे नाव आहे. अर्चनाचे पती राकेश सलीमठ यांनी सांगितले की, अर्चना आठ महिन्यांची गरोदर होती. आम्ही तिची सुरुवातीपासूनच व्ही. एन. देसाई रुग्णालयात नोंदणी केली होती. काही दिवसांपूर्वी ती रुटीन चेकअपसाठी गेली असता डॉक्टरांनी हिमोग्लोबिन कभी असल्याचे सांगितले. त्यासाठी ४ इंजेक्सन्सचा डोसदेखील घेण्यास त्यांना सांगितले गेले.
तिला काही दिवसांच्चा अंतराने रुग्णालयात तपासणीसाठी बोलावण्यात आले. ७ नोव्हेंबर रोजी त्या शेवटचा डोस घेण्यास मेल्या मात्र डोस घेतल्यानंतर त्यांच्या डोके, छाती आणि पाठीत असह्य वेदना जाणवू लागल्या. त्यांनी मला कॉल केला आणि मी कामावरून घेट रुग्णालयात येण्यास सांगितले, मी रुग्णालयात पोहोचल्यावर तेथील डॉक्टरांची भेट घेतली तेव्हा बाळाच्या हृदयाचे ठोके ऐकू येत नसून प्रसूतीसाठी ऑपरेशन करावे लागेल, असे डॉक्टरांकडून सांगण्यात आले.
त्यानंतर डॉक्टरांनी सुखरूप प्रसूती केली. परंतु बाळाची प्रकृती नाजूक असल्याने त्याला एनआयसीयूमध्ये ठेवण्यात आले. त्याचवेळी अर्चना यांना तब्येत खालावल्याने नागर रुग्णालयात हलवले. अति प्रमाणात औषधे दिल्याने व योग्य टाके न लावले गेल्याने माझ्या पत्नीचा मृत्यू झाला, असा आरोप अर्चना यांच्या पतीने केल्य.