जळगाव मिरर | १९ जानेवारी २०२५
जळगाव शहरातील अनेक भागात नेहमीच छोट्या मोठ्या कारणावरून हाणामारीच्या घटना घडत असताना आज पहाटेच्या सुमारास पूर्व पूर्ववैमनस्यांतून पिंप्राळा येथील एका कुटुंबावर प्राणघातक हल्लाकरीत एका तरुणाची चॉपर आणि कोयत्याने सपासप वार करून निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना आज 19 रविवार रोजी सकाळी घडली. या घटनेत पाच ते सात जण गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे. मुकेश रमेश शिरसाठ वय 26 रा. पिंप्राळा हुडको असे मयत तरुणाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील पिंप्राळा हुडको परिसरात राहणाऱ्या शिरसाठ कुटुंबावर जुन्या भांडणातून आलेल्या हल्लेखोरांनी मुकेश रमेश शिरसाठ याच्यासह त्याच्या कुटुंबातील निळकंठ सुखदेव शिरसाठ वय 45 कोमल निळकंठ शिरसाठ वय 20 ललिता निळकंठ शिरसाठ वय 30 आणि सनी निळकंठ शिरसाट( वय 21 )या सर्व जणांवर चॉपर कोयता आणि चाकू सारख्या धारदार शस्त्रांनी हल्ला चढवून गंभीर जखमी केल्याची घटना आज सकाळी सुमारास घडली.
.यामध्ये मुकेश शिरसाट या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यावेळी शिरसाट कुटुंबीयांच्या नातेवाईकांनी रुग्णालयात धाव घेऊन प्रचंड आक्रोश केला. घटनेची माहिती कळतच रामानंद नगर पोलीस स्टेशनचे कर्मचाऱ्यांचे एलसीबी चे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड आदींनी घटनास्थळी धाव घेतली . यावेळी मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला. दरम्यान हल्ले खोरांचा पोलीसतपास करीत असून या प्रकरणी रामानंदनगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.