जळगाव मिरर | १२ ऑगस्ट २०२३
अमळनेर शहरातील एका परिसरात दारू दिली नाही म्हणून ‘सुलतान’ आणि ‘शाहरुख’ यांनी एका बिअरबारवर धिंगाणा घातला. तसेच दुकानाचे नुकसान केले. मालकाचे पैसेदेखील काढून घेतल्याची घटना दि. १० रोजी सायंकाळी घडली. या प्रकरणी अमळनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अमळनेर शहरातील बाजारपेठेत असलेल्या बिअर बारवर सुलतान रहिमखा पठाण ( वय ३७ ) याने दारूची बाटली मागितली. त्यावर मालकाने तू येथे दारू पिऊ नको, प्यायल्यावर तू पैसे देत नाही आणि काचेचे ग्लास फोडून नुकसान करतो. याचा राग येऊन सुलतान ने शिवीगाळ आणि दमदाटी केली. तसेच त्याचा भाऊ शाहरुख रहिम खान पठाण (वय ३६) याला बोलावून घेतले. दोन्ही भावांनी मालकाला मारहाण केली आणि त्याच्या खिशातील पैसे काढून घेतले. भांडण सोडवण्यास आलेल्या इतरांनाही दमबाजी केली. बार मालकाने दिलेल्या फिर्यादीवरून शाहरुख आणि सुलतान या भावांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. यात पोलिस निरीक्षक विजय शिंदे यांनी सुलतानला अटक केली तर शाहरुख फरार आहे. तपास सहायक पोलिस निरीक्षक हरिदास बोचरे करीत आहेत.