जळगाव मिरर | २१ जून २०२३
जामनेर तालुक्यातील एका गावातील २२ वर्षीय विवाहितेचा पतीने अनैसर्गिक कृत्य केल्या प्रकरणी तर सासरा व नदोईने विनयभंग केल्या प्रकरणी पहूर पोलिसात अत्याचाराच गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जामनेर तालुक्यातील एका गावातील २२ वर्षीय विवाहिता आपल्या परिवारासह वास्तव्यास आहे. या विवाहितेस सासरची मंडळींनी २१ एप्रिल २०२२ पासून तिला लग्नात हुंडा न दिल्याने तुझ्या माहेरून १० लाख रुपये घेवून यावे अशी सातत्याने मागणी करीत आहे. याच बरोबर विवाहितेच्या पतीने तिच्या सोबत तिच्या समती वाचून अनैसर्गिक कृत्य तर सासरा, नंदोई याने तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करीत विनयभंग केला तर सासऱ्याच्या बाकीच्या लोकांनी तिला १० लाख रुपये जर तु आम्हाला दिले तर तुला चांगले नादवू असा दम देत शिवीगाळ करीत मारहाण देखील केली आहे. या प्रकरणी विवाहितेने पहूर पोलिसात धाव घेत पतीसह सासरच्या ५ जणाविरोधात अत्याचार केल्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अमोल गर्जे हे तपास करीत आहेत.