जळगाव मिरर | १९ मार्च २०२४
जिल्हा कारागृहातील कैद्यांना मिळणाऱ्या निकृष्ट जेवणासह, सोयी सुविधा मिळत नाही. तसेच वैद्यकीय उपचार देखील मिळत नसून त्याला उपचारासाठी वाट पहावी लागत असते. यासह कैद्यांच्या विविध समस्यांसाठी राष्ट्रवादी शरद पवार गटातर्फे जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे कि, जिल्हा कारागृहातील कैद्यांना अतिशय निकृष्ट दर्जाचे जेवण दिले जात असून त्यांना पुरक आहार देखील मिळत नाही. त्याठिकाणी स्वयंपाकी नसल्याने कैद्यांकडूनच स्वयंपाक बनविला जात असतो. त्यासाठी वापरला जाणारा भाजीपाला हा देखील सडका वापरला जात असल्याने कारागृहातील कैद्यांच्या आरोग्याचा प्रयत्न निर्माण झाला आहे.
त्याचप्रमाणे कैद्यांना वेळेवर उपचार मिळत नसल्याने त्यांच्यावर कारागृहातच उपचार करुन त्यांच्या जीवाशी खेळले जात आहे. तसेच कारागृहात भेटण्यासाठी आलेल्या नातेवाईकांकडे तक्रार केल्यास कैद्याला इतर कारागृहात पाठविण्याची धमकी दिली जाते. कारागृहात करण्यात आलेले बांधकाम हे अनधिकृतपणे असून ते तोडण्याच्या सूचना देण्यात आले असून तरी देखील त्यावर कुठलीही कार्यवाही झालेली नाही. या तक्रारींची तात्काळ दखल घेऊन कैद्यांना सुविधा पुरावा. अन्यथा कारागृह प्रशासनाविरुद्ध मोर्चा काढणार असल्याचा इशारा राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष अशोक लाडवंजारी यांनी निवेदनाद्वारे दिले आहे.