जळगाव : प्रतिनिधी
श्री क्षत्रिय अहिर शिंपी समाज हितवर्धक संस्था संचलित युवक मंडळातर्फे दिनांक 7 ते 10 मार्च रोजी मानराज पार्क, जळगाव येथे शिंपी प्रीमियर लीग सीजन 3 चे भव्य आयोजक करण्यात आलेले होते.
सीजन थ्री चा शिंपी डायनामाईट हा संघ विजेता ठरलेला आहे याचे संघमालक संदीप सोनवणे व कर्णधार विकी जगताप व प्रतिनिधित्व सुमित अहिरराव यांनी केले होते. या रोमांचित स्पर्धेत एकूण 14 पुरुष टिमांनी व महिलांचे तीन संघाचा सहभाग घेतला होता. त्यात जळगाव जिल्ह्यातील व जिल्ह्या बाहेरून मालेगाव, धुळे, चोपडा ,मुंबई, पुणे दोंडाईचा, अशा टीमचा समावेश होता. क्रिकेट खेळाच्या माध्यमातून स्त्री – पुरुष समानतेचा संदेश समस्त समाजाला देणारा ठरलेला असून याद्वारे समाज संघटन व भावी क्रिकेट प्लेयर आपल्या मिळेल व उत्कृष्ट नियोजन युवक मंडळाने केलेले आहे असे आ सुरेश भोळे (राजु मामा) यांनी कार्यक्रमा प्रसंगी केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष- राजेंद्रकुमार सोनवणे व संस्था उपाध्यक्ष-विवेक जगताप हे होते प्रमुख अतिथी शिंपी समाज जिल्हाध्यक्ष बंडू नाना शिंपी विश्वस्त पी टी शिंपी ,अ.भा.युवक अध्यक्ष रूपेश बागुल,जिल्हा युवक अध्यक्ष तुषार शिंपी एरंडोल मुख्य चषक प्रायोजक प्रमोद शिंपी, आर एस पी कमांडर श्री मनीलाल शेठ शिंपी संजय कापुरे सुप्रीम जनरल मॅनेजर रविकिरणजी कोंबडे माजी नगरसेवक आबा कापसे संस्था सचिव अनिल खैरनार ,प्रदीप शिंपी, मनोज भंडारकर, सुरेश सोनवणे उमेश शिंपी गणेश सोनवणे हे होते कार्यक्रम यशस्वी ते साठी शहर युवक अध्यक्ष जितेंद्र शिंपी SPL प्रमुख सुमित अहिरराव, युवक सचिव हेमंत शिंपी एस पी एल कोषाध्यक्ष योगेश दगडू शिंपी, त्याचबरोबर आयोजक टीम मधून गणेश सोनवणे, अमित मुळतकर, निलेश शिंदे यशवंत शिंपी महेश शिंपी, विशाल देवरे, निलेश चव्हाण, सागर शिंपी (चार्ली) धर्मेंद्र जगताप हर्षल बोरसे, हर्षल शिंपी, उल्हास देवरे, सागर देवरे, ऋषिकेश शिंपी ,अशोक सोनवणे,सर्पमित्र दर्शन देवरे आदींनी परिश्रम घेतले व सूत्रसंचालन सचिन जाधव व आभार प्रदर्शन योगेश शिंपी यांनी केले.