जळगाव मिरर | २१ मार्च २०२४
भुसावळ येथील भारतीय जनता पार्टीमध्ये अनेक वर्षांपासून कार्यरत असणारे निष्ठावंत कार्यकर्ते शिशिर दिनकर जावळे यांची महाराष्ट्र राज्य भारतीय जनता पार्टीच्या ओबीसी मोर्चाच्या प्रदेश सचिव पदी नुकतीच निवड जाहीर करण्यात आली.
सविस्तर वृत्त असे की, भुसावळ शहरात सामाजिक क्षेत्रातील अग्रेसर असणारे तसेच ओबीसी चळवळीतील युवा नेतृत्व , ओबीसी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी शासन दरबारी ओबीसींच्या विविध मागण्यांचा पाठपुरावा करणारे व ओबीसी चळवळ प्रकल्प करणारे ओबीसी समाजाचे युवा नेतृत्व असणारे तसेच भारतीय जनता पार्टीचे जुने निष्ठावंत कार्यकर्ता यांची नुकतीच भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश ओबीसी मोर्चाच्या सचिव पदी जलसंपदा व ग्राम विकास मंत्री आमदार श्री गिरीश भाऊ महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष श्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या शिफारशीनुसार महाराष्ट्र भाजपा ओबीसी मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष श्री संजय जी गाते यांनी त्यांची महाराष्ट्र राज्य ओबीसी मोर्चाचे प्रदेश सचिव पदी नियुक्ती केली. त्यांच्या या यशाबद्दल त्यांचें बेटी बचाव बेटी पढाव चे राष्ट्रीय संयोजक डॉक्टर राजेंद्र फडके, , भाजपा प्रदेश उपाध्यक्ष श्री अशोक कांडेलकर, जळगाव जिल्हा (पूर्व)जिल्हाध्यक्ष अमोल जावळे,ओबीसी मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस प्रवीण भाऊ इखनकर, उ. महाराष्ट्र संपर्क प्रमुख भरत भाऊ महाजन, लोकसभा क्षेत्र प्रमुख श्री नंदकिशोर महाजन, यांनी अभिनंदन केले आहे. याप्रसंगी ओबीसी चळवळ प्र गल्भ करून ओबीसी समाजातील सर्वसामान्यांच्या व समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी कायम कटिबद्ध असल्याचं व या पदाच्या माध्यमातून अहोरात्र ओबीसींसाठी काम करणार असल्याचे प्रतिपादन शिशिर जावळे यांनी व्यक्त केलेल आहे.
