जळगाव मिरर | १९ जून २०२५
शिवसेना वर्धापन दिनानिमित्त जळगाव शहरातील अनेक परिसरातील सामाजिक कार्यक्रमातून साजरा केला जात आहे. तर प्रभाग क्र.१ मध्ये देखील वृक्षारोपण करीत वर्धापन दिन साजरा करण्यात आला.
शहरातील दुध फेडरेशन परिसरातील शिवसेना महानगर प्रमुख संतोष पाटील, शिवसेना विधानसभा क्षेत्र प्रमुख श्याम भाऊ कोगटा यांच्या प्रमुख उपस्थिती वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी शिवम सोनवणे, चंद्रसेन निकम, प्रशांत सोनवणे, मोहन भालेराव, विनोद सोनवणे, सचिन कापडणे, अनिल सावळे, पंकज पारेराव, कुणाल हटकर, मोहन रुपवते, मुकेश सुस्ते, आतिश कदम, पिंटू सोनवणे, राहुल खुळे, रोहित कचुरे यांच्यासह परिसरातील नागरीकांची उपस्थिती होती.
