जळगाव मिरर / २९ नोव्हेंबर २०२२
महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या बेताल वक्तव्याचा निषेध करण्यासाठी शिवसेना जळगाव महानगर तर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली.
राज्यपाल भगतसिंग कोष्यारी यांनी महापुरुषांचा वारंवार अपमान करून देखील त्यांना पदमुक्त केले जात नाही याचा निषेध म्हणून शिवसेना जळगाव महानगराच्या वतीने महीला आघाडीच्या गायत्री सोनवणे यांच्या वतीने स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालया समोर ३ दिवस ही मोहीम राबवण्यात येऊन राज्यपाल हटवा महाराष्ट्र वाचवा चा नारा यावेळी देण्यात आला.
शिवसेना जळगाव महानगर प्रमुख शरद तायडे युवासेना जिल्हाप्रमुख पियूष गांधी अल्पसंख्यांक आघाडी चे जाकीर पठाण उप महानगर प्रमुख गणेश गायकवाड प्रशांत सुरळकर मानसिंग सोनवणे फरीद खान डॉ जुबेर खान बाळा कांखरे शाकीर खान युवासेना महानगर प्रमुख अमोल मोरे पुनम राजपूत शुभम निकम महीला आघाडीच्या गायत्री सोनवणे नीलू इंगळे चारुलता सोनवणे शारदा तायडे विजय कोळी जितेंद्र पाटील बिरजू शिरसाठ मयूर गायकवाड जमीर नागोरी उमेश बारी कुंदन पाटील राजेश माळी निखिल सोनवणे अजय सोनार बिलाल खाटीक अब्रार खाटीक आशिम पाटील वशिम पाटील रफिक शेख जुबेर खाटीक प्रेम ठाकूर शरीफ रांगरेज आदींसह पदाधिकारी शिवसैनिक मोठ्या संख्येने हजर होते
