जळगाव मिरर / ९ नोव्हेंबर २०२२
पत्राचाळ घोटाळा प्रकरणात ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांना जामीन मंजूर झाल्यानंतर आज सायंकाळी सात वाजता त्यांना कारागृहातून सोडण्यात आले. जेलमधून ते भगवा मफलर परिधान करून ते बाहेर पडले. ते येताच त्यांचे धुमधडाक्यात स्वागत करण्यात आले. यावेळी राऊत यांचे कुटुंबिय आणि मोठ्या प्रमाणात शिवसैनिकांची उपस्थिती आहे. लढवय्या योद्धा अशा आशयाचे फलकही लावण्यात आल्याचे दिसून आले.
संजय राऊत म्हणाले कि, ”कारागृहातून सुटल्याचा मला आनंद वाटत आहे. माझा न्यायालयावरील विश्वास वाढला असून आता आपली लढाई सुरूच राहणार आहे. असे यावेळी मीडियाशी बोलताना सांगितली.
#WATCH | Shiv Sena (Uddhav Thackeray faction) leader Sanjay Raut released from Arthur Road jail after Mumbai's PMLA court granted him bail in Patra Chawl land scam case earlier today. pic.twitter.com/9LnLnmV3aI
— ANI (@ANI) November 9, 2022
सुटकेनंतर संजय राऊत यांनी पहिली पहिली प्रतिक्रीया दिली असून मला सुटल्याचा आनंद वाटत असून माझा न्यायालयावरील विश्वास वाढला आहे. न्यायालयाचे निरीक्षण आहे हे आम्ही सांगतच होतो. माझी प्रकृती बरी नाही मी नक्की बोलेल. पत्राचाळ घोटाळा प्रकरणात ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांना जामीन मंजूर झाला.पीएमएलए न्यायालयाकडून त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. तसेच, या प्रकरणात प्रवीण राऊत यांनाही न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. त्यानंतर या निर्णयाविरोधात इडीतर्फे मुंबई हायकोर्टात धाव घेतली. परंतु, हायकोर्टानेही संजय राऊत यांच्या जामिनावरील स्थगितीला नकार दिला. हा राऊतांना सर्वात मोठा दिलासा तर इडीला झटका मानला जात असून आज सायंकाळी सातपर्यंत राऊत जेलमधून बाहेर येणार आहेत. शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांची प्रकृती फारशी ठिक नाही. ते लवकरच रुग्णालयात दाखल होतील अशी स्पष्टोक्ती त्यांचे बंधुू सुनील राऊत यांनी आज आर्थर रोड कारागृहातबाहेर माध्यमांशी बोलताना दिली. संजय राऊत यांना जामीन मिळताच या निर्णयाला स्थगिती द्यावी, अशी मागणी ईडीने पीएमएलए न्यायालयाला केली. ईडीच्या अर्जावर दुपारी तीन वाजता न्यायालयात सुनावणी झाली. सुनावणीत ईडीची ही मागणी पीएमएलए कोर्टाने फेटाळून लावली. त्यामुळे संजय राऊत यांच्या सुटकेचा मार्ग मोकळा झाला आहे. गेल्या 100 दिवसांपासून संजय राऊत कोठडीत आहेत. आज त्यांना जामीन मंजूर झाल्याने ठाकरे गटाने जल्लोष केला आहे. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची तोफ बाहेर येऊन पुन्हा धडाडणार, अशी प्रतिक्रिया ठाकरे गटाच्या नेत्यांनी दिली आहे. ‘टायगर इज बॅक’, अशी प्रतिक्रिया ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी दिली आहे.
